Wifi Scam  Canva
गोवा

Marago WiFi Scam: मडगाव पालिकेत आता ‘वाय-फाय’ बिलाचा घोटाळा!

Margao Municipal Council: मडगाव नगरपालिकेत सध्या आर्थिक घोटाळ्याबद्दलची एकेक प्रकरण उघड होत आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: मडगाव नगरपालिकेत सध्या आर्थिक घोटाळ्याबद्दलची एकेक प्रकरण उघड होत आहेत. हल्लीच कारकुनाचा १७ लाख रुपयांचा घोटाळा तसेच स्टोअर रुममधील एक कोटींचा घोटाळा ताजा असतानाच आता नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी वाय-फाय बिलाबद्दलचा १७ हजारांचा घोटाळा उघड केला आहे.

यामध्ये १७ लाखांच्या घोटाळ्यात कारकून शेटकरसह माजी मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर जबाबदार असल्याचा आरोपही नगराध्यक्षांनी केला आहे. धनादेशावर कंपनीचे नाव नसून योगेश शेटकर याचे नाव असल्याने नगराध्यक्षांनी आश्र्चर्य व्यक्त केले आहे.

व्हाय फाय बिलाच्या १७ हजार रुपयांच्या व्हाऊचरवर मुख्याधिकाऱ्यांची सही आहे. मात्र ही रक्कम वाय फाय कंपनीला पोहोचती न करता ही रक्कम योगेश शेटकर याच्या कर्ज खात्यात जमा झाल्याचे नगराध्यक्षांचे म्हणणे आहे.

हे एकच नव्हे, अशी अनेक निधी गैरव्यवस्थापन प्रकरणे शंखवाळकर यांच्या कार्यकाळात आहेत, असेही नगराध्यक्षांनी सांगितले. सतरा लाखांचा घोटाळा आपण उघड केल्याचे नगराध्यक्ष म्हणतात.

सध्या योगेश शेटकर फरार असुन पोलिसांनी त्याच्यासाठी लुक आऊट नोटीस काढलेली आहे. तो नगरपालिकेतही येत नाही. त्यामुळे त्याला नोकरीतुन काढून टाकावे अशी आपली भूमिका असली तर विद्यमान मु्ख्याधिकारी काय निर्णय घेतात ते पहावे लागेल, असे नगराध्यक्ष शिरोडकर सांगतात.

नगराध्यक्षांचीच मिलीभगत!

मुख्याधिकाऱ्याच्या केबिनमधील टीव्ही ला वाय फाय कनेक्शन असणे गरजेचे असते. त्यासाठी आम्ही रेल इंडिया या रेल्वेच्या कंपनीकडून हे कनेक्शन घेतले आहे. नगरपालिकेत जे कर्मचारी आहेत, ते नगराध्यक्षांचेच चेले असून या सर्वांमध्ये नगराध्यक्षांचीच मिलीभगत असल्याचेही शंखवाळकर यांनी शेवटी सांगितले.

कॅशियरचेही हात वर

योगेश याने ही रक्कम आपण फेडल्याचे सांगून आपल्या नावे धनादेश काढण्यास सांगितले, असे कॅशिअरचे म्हणणे आहे. यात आपण या घोटाळ्यात गुंतलेला आहे, असे कसे म्हणता येईल? आपल्याकडे दिवसातून अशा अनेक फाईली येत असत व प्रत्येक फाईल बारकाईने पाहणे शक्य होत नाही. पण आपली सही झाल्यावरच त्या फाईलमध्ये गफलत करण्यात आली असावी,अशी शक्यता शंखवाळकर यांनी व्यक्त केली.

शंखवाळकर यांचे स्पष्टीकरण

या संदर्भात माजी मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की, आपण त्या वाय-फाय बिलाच्या व्हाऊचरवर सही मारली. कारण तो व्हाऊचर योग्य कार्यालयीन मार्गाने आला होता. त्यावर प्रथम अकाऊंटस व टॅक्सेशन अधिकाऱ्याची, नंतर अकाऊंटस अधिकाऱ्यांची सही असून नंतर आपली सही आहे. शिवाय या मध्ये कॅशिअरची सुद्धा चूक आहे. त्याने धनादेश कंपनीच्या नावे न काढता योगेश शेटकर याच्या नावे कसा काढला. आपण त्या कॅशिअरला मेमो दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

SCROLL FOR NEXT