Margao Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Margao Municipality: सोपो निविदेला अजूनही ‘नो रिस्पॉन्स’

Margao: निविदेसाठी एकाही ठेकेदाराने प्रतिसाद न दिल्याने पालिकेला आता स्वतःच सोपो गोळा करावा लागणार आहे

दैनिक गोमन्तक

मडगाव नगरपालिकेने सोपो (Sopo Tax) गोळा हक्क बहाल करण्यासाठी पुकारलेल्या निविदेसाठी एकाही ठेकेदाराने प्रतिसाद न दिल्याने पालिकेला आता स्वतःच सोपो गोळा करावा लागणार आहे.

या ठेक्यासाठी सुरवातीची 83.84 लाखांची बोली होती. पण निविदा नेण्यासाठी कुणीच प्रतिसाद दिला नाही. सदर हक्कांसाठी जी तीन वर्षे अनुभवाची अट घातली गेली होती त्याचाच हा परिणाम असावा, असा कयास आहे. सदर अट गत पालिका बैठकीत वादग्रस्त ठरली होती व नगराध्यक्ष लिंडन परेरासह तमाम नगरसेवकांनी ती गाळण्याची मागणी केली होती.

एवढेच नव्हे, तर मुख्याधिकारी रोहित कदम यांनी पालिका वकिलही त्या अटीविरुध्द असल्याचे स्पष्ट केले होते. असे असताना नव्याने सोपो निविदा मागविताना या अटीचा आग्रह का धरला गेला, असा सवाल व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, गतवेळी ही अट असताना सोपोसाठी एकमेव ठेकेदाराने प्रस्ताव सादर केला असता त्यावर कोणताच निर्णय न घेता पालिकेने तो सरकारकडे पाठवला व नंतर नव्याने निविदा मागविल्या होत्या. नव्या सोपो गोळा कंत्राटाचा कालावधी 1 सप्टेंबर ते 31 आँगस्ट 2023 असा होता. खात्याकडून सोपो गोळा करणे म्हणजे महसुलाला मुकणे, असे असतानाही पालिकेला आता तोच पर्याय स्वीकारावा लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT