Margao Masli Market Churchill Alemao Daji Salkar  Dainik Gomantak
गोवा

Margao Masli Market : मासळी विक्रीसाठी थोडा अवधी द्या! चर्चिल यांचे दाजी साळकर यांना साकडे

घाऊक मासळी मार्केटमध्ये उरलेली मासळी विक्रीसाठी मच्छीमारांना आणखी थोडा वेळ द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी, ता. १९ (प्रतिनिधी) : माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी आज गोमंतकीय पारंपरिक मच्छीमारांसह एसजीपीडीएचे अध्यक्ष तथा आमदार कृष्णा उर्फ दाजी साळकर यांची भेट घेतली.

घाऊक मासळी मार्केटमध्ये उरलेली मासळी विक्रीसाठी मच्छीमारांना आणखी थोडा वेळ द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी दाजी साळकर म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणेच आम्हाला निर्णय घ्यावे लागतात. त्याप्रमाणे आम्ही नियोजन के आहे. ही कायदेशीर बाब असल्याने आम्ही मच्छीमारांना कोणतेही आश्र्वासन दिलेले नाही.

त्यांनी स्वत:च काहीतरी पर्याय शोधावा, असा सल्ला त्यांना दिला आहे. आम्ही मार्केटमध्ये स्वच्छतेला प्राधान्य देत असून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम हाती घेतले आहे.

यावेळी आलेमाव म्हणाले की, पारंपरिक गोमंतकीय मासळी विक्रेत्यांकडे उरलेली मासळी साठवून ठेवण्यासाठी पुरेशी साधनसुविधा नाही. काही वेळानंतर मासळी खराब होते.

त्यामुळे आणलेल्या सर्व मासळीची विक्री होईपर्यंत त्यांना थांबावे लागते. या मासळी विक्रेत्यांना आणखी थोडा वेळ मासळी विक्रीची मोकळीक द्यावी, अशी विनंती त्यांनी केली.

मी यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्याशीही चर्चा केली असून सर्वांनीच सहानुभूतीपूर्वक तोडगा काढू, असे सांगितल्याचे आलेमाव म्हणाले.

यापूर्वी पारंपरिक मच्छीमारांना मासे विक्रीसाठी वेळ ठरवून दिली असून तेथील किरकोळ विक्रेत्यांना अन्यत्र जागा देण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT