Margao Konkan Railway Station Dainik Gomantak
गोवा

Margao Konkan Railway Station: मडगाव 'कोकण रेल्वे' स्थानकाचा लवकरच कायापालट! 200 कोटी मंजूर; दुप्पट रेल्वेंचे परिवहन शक्य

Margao Konkan Railway Station: प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी देशांतर्गत शहरांमधील कनेक्टिव्हिटी साधण्यासाठी रेल्वे स्थानकांचा विकास आवश्यक असल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांचे म्हणणे आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: भारतीय रेल्वेने पुढील पाच वर्षांत ज्या ४८ रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे, त्याची यादी तयार जाहीर केली आहे. त्यात मडगावातील कोकण रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. सध्या या स्थानकावरून जेवढ्या रेल्वे ये जा करतात, त्यापेक्षा दुप्पट रेल्वे विकास केल्यानंतर या स्थानकावरून ये जा करतील.

गोव्यातील रेल्वे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र इथून सोडणाऱ्या गाड्यांची संख्या कमी पडते. या सर्वांचा विचार करून २०३० पर्यंत इतर रेल्वे स्थानकांबरोबर मडगावच्या रेल्वे स्थानकाचा सुद्धा विकास केला जाईल. मडगावच्या विकासासाठी भारतीय रेल्वेने २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

ही माहिती काही दिवसांपूर्वी कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष तथा कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. दक्षिण रेल्वे व्यवस्थापनाने दोन दिवसांपूर्वी प्रसिद्धी पत्रकाद्वारे देशातील रेल्वे स्थानकांच्या विकासाची माहिती दिली आहे.

प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी देशांतर्गत शहरांमधील कनेक्टिव्हिटी साधण्यासाठी रेल्वे स्थानकांचा विकास आवश्यक असल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांचे म्हणणे आहे.

विविध सुविधा उभारणार

या विकासकामांत जादा प्लॅटफॉर्म तयार करणे त्याच प्रमाणे स्टेबलिंग लाईन्स, पीट लाइन्स व सुधारीत शंटींग सुविधा उपलब्ध केली जाईल. त्याचप्रमाणे स्थानकाच्या परिसरात आणखी नवी टर्मिनलचा विकास केला जाईल. सिग्नल्स सुविधांमध्ये वाढ करणे व काही ठिकाणी जादा रुळ घालणे अशा कामांचा समावेश आहे.

ज्या इतर स्थानकांचा विकास करण्यात येईल त्यात दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैद्राबाद, बेंगळुरु, अमदावद, पाटणा, लखनौ, पुणे, नागपूर, वाराणसी, कानपूर, गोरखपूर, मथुरा, आग्रा, अयोध्या. जयपूर, कोचीन या व इतर स्थानकांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT