Nathan Joseph Mendes (Tsumyoki) Dainik Gomantak
गोवा

कौतुकास्पद! माडगावच्या हिप-हॉप स्टार नॅथन मेंडिसला प्रतिष्ठित MTV युरोपियन संगीत पुरस्कारासाठी नामांकन

नोव्हेंबर महिन्यात पॅरिसमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.

Pramod Yadav

Nathan Joseph Mendes: माडगावचा हिप-हॉप स्टार नॅथन जोसेफ मेंडिस त्सुमायोकी (Tsumyoki) याने आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवले आहे. नॅथनला प्रतिष्ठित MTV युरोपियन संगीत पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

नोव्हेंबर महिन्यात पॅरिसमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. नॅथनच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मडगाव येथे जन्मलेला नॅथन मेंडिस रॅपर असून तो हिपहॉप, लोक संगीत आणि पॉप संगीत करतो तसेच स्वत: गीतकार देखील आहे. त्याची अनेक गाणी पिंक ब्ल्यु, एक दो एक, इट्स ऑलराईट, परफेक्ट लाईन यासारखी विविध गीते युवा वर्गात प्रसिद्ध आहेत.

संगीत मला नेहमीच प्रेरणा देते, संगीत माझ्यासाठी थेरपीचे काम करते. लोकांना देखील प्रेरीत करायला मला आवडते, लोक मला मेसेज करतात त्यातून लोकांचे प्रेम मिळते. मला याच गोष्टी नवीन काम करण्याची प्रेरणा देतात, असे नॅथन म्हणाला.

रॅपर नॅथन मेंडिसची अनेक गाणी युट्युबवर ऐकता आणि पाहता येतील अलिकडेच त्याचा मेसेज फ्रॉम द मून हा अल्बम प्रिसिद्ध झाला असून, त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

नॅथनवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे, वन आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी देखील थन मेंडिसचे कौतुक करत त्याला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT