Margao Fish Market Dainik Gomantak
गोवा

Margao Fish Market: मडगाव 'मासळी मार्केट'ची इमारत बांधून वर्ष उलटलं, पण उद्घाटनाला मुहूर्त मिळेना! व्यापारी आणि मच्छीमार संभ्रमात

margao fish market inauguration delay: मडगाव येथील एसजीपीडीएच्या नव्या घाऊक मासळी मार्केटची इमारत पूर्ण होऊन वर्षाहून अधिक काळ लोटला असला, तरी अद्याप तिचे उद्घाटन झालेले नाही.

गोमंतक ऑनलाईन टीम

सासष्टी: मडगाव येथील एसजीपीडीएच्या नव्या घाऊक मासळी मार्केटची इमारत पूर्ण होऊन वर्षाहून अधिक काळ लोटला असला, तरी अद्याप तिचे उद्घाटन झालेले नाही. त्यामुळे मार्केटच्या बाहेरील परिसरातच मासळी विक्री सुरू असून दुर्गंधी, सांडपाणी आणि अस्वच्छतेच्या समस्येमुळे नागरिक व विक्रेत्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे विक्रेत्यांना नाहकत्रास सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांच्या पुढाकाराने मार्केट परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण आणि हॉटमिक्सिंगचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मासळी विक्रेते व्यवसाय करतात तसेच मासळी वाहतूक करणारी वाहने उभी केली जातात, त्या संपूर्ण परिसराचा समावेश या कामात करण्यात आला. यामुळे चिखल, घाण आणि सांडपाणी यांपासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दिगंबर कामत म्हणाले, परिसराच्या डांबरीकरणाची मागणी अनेक मासळी विक्रेत्यांनी केली होती. त्यानुसार ही मागणी पूर्ण करण्यात आली असून यामुळे विक्रेते तसेच नागरिकांना होणारा त्रास कमी होईल. मात्र नव्या घाऊक मासळी मार्केटच्या उद्घाटनाचा निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याकडे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मच्छीमार पेले फर्नांडिस यांनी परिसराचे डांबरीकरण केल्याबद्दल मंत्री दिगंबर कामत आणि आमदार विजय सरदेसाई यांचे आभार मानले. तर मच्छीमार फ्रॅंकलीन डिकॉस्ता यांनी डांबरीकरणामुळे घाण पसरण्याचे प्रमाण कमी होईल, असे सांगत मार्केटची इमारत तातडीने सुरू करण्याची मागणी केली. "पूर्णत्वास जाऊन वर्षभर उलटलेल्या या इमारतीचे रूपांतर पांढऱ्या हत्तीत होऊ नये, एवढीच आमची अपेक्षा आहे," असे त्यांनी नमूद केले.

नवे घाऊक मासळी मार्केट कार्यान्वित झाल्यास मच्छीमारांना आधुनिक सुविधा उपलब्ध होतील, तसेच शहरातील मासळी विक्री अधिक नियोजनबद्ध आणि स्वच्छ पद्धतीने होण्यास मदत होईल. त्यामुळे उद्घाटनाचा निर्णय आणखी लांबणीवर न टाकता संबंधित यंत्रणांनी त्वरित कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

स्वच्छतेचे प्रश्न!

आमदार विजय सरदेसाई यांनीही मार्केट सुरू होण्याबाबत कोणतीही ठोस माहिती देण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे व्यापारी, मच्छीमार आणि नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण कायम आहे. एकीकडे अत्याधुनिक सुविधा असलेली इमारत वापराविना उभी आहे, तर दुसरीकडे बाहेरच मासळी विक्री सुरू असल्याने सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेचे प्रश्न निर्माण होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT