Margao Fish Market Dainik Gomantak
गोवा

Margao Fish Market : मडगावातील एसजीपीडीए मासळी मार्केटची दुरवस्था; विक्रेते, नागरिक हैराण

Margao Fish Market : कचरा व्यवस्थापनाचा अभाव व मार्केटची होत नसलेल्या देखभालीमुळे ही स्थिती ओढवल्याचे नागरिक बोलू लागले आहेत. दूषित पाणी तिथेच टाकले जाते. गटारे पूर्ण भरल्याने सांडपाणी रस्त्यावरूनच वाहत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Fish Market :

सासष्टी, दक्षिण गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरण (एसजीपीडीए)च्या किरकोळ मासळी मार्केटच्या दुरवस्थेमुळे नागरिक हैराण झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

मासळी विक्रेत्यांना देखील तिथे बसणे असह्य होत असल्याचे विक्रेत्यांनी स्पष्ट केले.

कचरा व्यवस्थापनाचा अभाव व मार्केटची होत नसलेल्या देखभालीमुळे ही स्थिती ओढवल्याचे नागरिक बोलू लागले आहेत. दूषित पाणी तिथेच टाकले जाते. गटारे पूर्ण भरल्याने सांडपाणी रस्त्यावरूनच वाहत आहे.

नागरिकांना त्यातूनच मार्केटमध्ये प्रवेश करावा लागतो. मार्केटमधील जमिनीवरील टाइल्स तुटलेले आहेत व पाणी तिथेच मुरते. त्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य सध्या मार्केटमध्ये पसरले आहे.

मार्केटमधील कचरा रस्त्याच्या बाजूलाच टाकलेला दिसत आहे. हा कचरा कुणी उचलावा याबद्दल मडगाव पालिका व एसजीपीडीएमध्ये वाद असल्याचे सांगण्यात येते.

एसजीपीडीए, पालिकेचे दुर्लक्ष

किरकोळ मासळी विक्रेते संघटनेचे अध्यक्ष फेलिक्स गोन्साल्विस यांनी सांगितले की, याबद्दल अनेक तक्रारी करूनही त्याचा काहीच फायदा होताना दिसत नाही. मासळी विकत घेण्यासाठी येणारे ग्राहक तर दररोज तक्रारी करतात.

त्यांना आम्ही काय सांगणार असा प्रश्न ते करत आहेत. याबाबत उच्च न्यायालयात तक्रार अर्ज दाखल करण्याशिवाय आमच्यापुढे दुसरा पर्याय राहिला नसल्याचेही गोन्साल्विस यांनी स्पष्ट केले. एसजीपीडीए व नगरपालिका आमच्या तक्रारीची दखलच घेत नसल्याबद्दल मासळी विक्रेत्या फातिमा कार्दोज यांनीही नाराजी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: ..समस्या सोडवा अन्यथा चक्का जाम आंदोलन! गोवा कॉंग्रेसचा इशारा; डिचोली IDC तील रस्ता खड्डेमय

Comunidade Land: नगर्से कोमुनिदादीची जमीन दिल्‍लीतील पार्टीच्‍या घशात! स्‍थानिकांचा आरोप; सरदेसाईंनी वाचा फोडण्‍याची मागणी

Astrology Today: बुधादित्य योगामुळे धनलाभ आणि नव्या संधी; वृषभ, मिथुनराशीसोबत 'या' लोकांसाठी अत्यंत लाभदायक दिवस

Colvale Jail: कोलवाळ कारागृहाला ‘मानवाधिकार’ने फटकारले! शौचालयांमध्ये दरवाजांचा अभाव; जॅमरसह सीसीटीव्‍हींची शिफारस

Goa Politics: खरी कुजबुज; भाऊ, कशी होणार रे विरोधी आघाडी!

SCROLL FOR NEXT