Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Margao News : गोमंतकीय चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन द्या! युरी आलेमाव

Margao News : ‘कान्स’मध्ये प्रतिनिधित्व; सुयश, अक्षयचे अभिनंदन

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News :

मडगाव, ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट’ या चित्रपटासाठी दिग्दर्शकाचे साहाय्यक आणि द्वितीय युनिट सिनेमॅटोग्राफर म्हणून कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी झालेले गोव्याचे सुयश कामत यांचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी अभिनंदन केले असून, कान्स महोत्सवात ३० वर्षांत भारतीय चित्रपटाचा मुख्य स्पर्धा विभागात समावेश होणे, ही अभिमानास्पद बाब आहे, असे त्यांनी म्हटले.

‘एफटीआय’चे माजी विद्यार्थी असलेले अक्षय पर्वतकर यांचेही अभिनंदन करतो, ज्यांनी वॉकर्स ॲण्ड कंपनीच्या फेलोशिपचा भाग म्हणून कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भाग घेतला. फिल्म कम्पॅनियनच्या सहकार्याने त्यांच्या "द वॉकर्स प्रोजेक्ट"साठी माझ्या शुभेच्छा, असेही आलेमाव म्हणाले.

गोव्यासाठी हा खरोखरच अभिमानाचा क्षण आहे की, आमचे प्रतिभावान युवक कान्स फिल्म फेस्टिव्हलसारख्या प्रतिष्ठित महोत्सवात सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवत आहेत. दुर्दैवाने गेल्या ११ वर्षांत राज्य सरकार स्थानिक चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यात अपयशी ठरले आहे, अशी खंत आलेमाव यांनी केला आहे.

आगामी विधानसभा अधिवेशनात स्थानिक चित्रपट निर्मात्यांना मदतीचा मुद्दा मी पुन्हा एकदा उपस्थित करणार आहे. स्थानिक कलागुणांना प्रोत्साहन देण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे आणि बिगर गोमंतकीयांना प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमांवर सरकार उधळपट्टी करीत आहे, असा आरोप युरी यांनी केला.

कॉंग्रेसची वित्त योजना गुंडाळली

काँग्रेस सरकारने स्थानिक चित्रपट निर्मात्यांसाठी गोवा चित्रपट वित्त योजना सुरू करून चित्रपट निर्मात्यांना त्यांची कलाकृती भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अधिकृत विभागात प्रदर्शित करण्याची संधी दिली होती. दुर्दैवाने भाजप सरकारने ही योजना गेल्या ११ वर्षांत गुंडाळून ठेवली, असा ठपका आलेमाव यांनी ठेवला.

फिल्म सिटी नको, फिल्म स्कूल हवे!

सरकारने कालबाह्य संकल्पना असलेल्या "फिल्म सिटी" प्रकल्पावर जनतेचा निधी खर्च करण्यापेक्षा स्थानिक चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यावर भर दिला पाहिजे. तंत्रज्ञान बदलले आहे आणि आता संगणकावर सर्व काही करता येते. सरकारचे लक्ष आता फिल्म मेकिंगमधील फिल्म स्कूल्स आणि प्रशिक्षणावर असले पाहिजे, असे युरी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shri Saptakoteshwar: शिवरायांनी जीर्णोद्धार केलेल्या ‘सप्तकोटीश्वर’चा इतिहास उलगडणार, पर्यटन खात्याकडून चित्रपटाची निर्मिती

Goa Shack Policy: शॅक्सच्या ‘सबलेटिंग’ प्रकरणांचा पुनर्विचार होणार! मंत्री खंवटेंनी दिली माहिती; 23 परवान्यांचे होणार नूतनीकरण

GCA: 'गोवा क्रिकेट'ची धुरा कुणाच्या हातात राहणार? निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष; 5 जागांसाठी दुहेरी चुरस

Goa Live Updates: अनमोड घाट रस्ता सहाचाकींसाठी खुला

Goa News: '..हा अपघात नाही घातपात'! बार्रेटो मृत्‍यूप्रकरणी आईकडून शंका; न्यायासाठी राष्‍ट्रपती, पंतप्रधानांकडे साकडे

SCROLL FOR NEXT