Covid Diagnosis Lab Dainik Gomantak
गोवा

मडगावची ‘कोविड निदान लॅब’ झाली दोन वर्षांची

2 लाखांवर चाचण्या पूर्ण: दुसऱ्या लाटेच्यावेळी लागली होती कसोटी

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यात कोविड महामारीने उग्ररूप धारण केले, त्यावेळी सरकारने हॉस्पिसिओमधील कोविड लॅबचे स्थलांतर जिल्हा इस्पितळात केले होते. त्याला उद्या 10 मे रोजी दोन वर्षे होणार आहेत. या दोन वर्षांत या प्रयोगशाळेत 2 लाखांहून अधिक लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या. ज्यावेळी गोव्यात कोविडची दुसरी लाट आली आणि दरदिवशी हजारो रुग्ण चाचण्यासाठी येऊ लागले, त्यावेळी त्यांच्यासाठी हा कसोटीचा काळ असूनही त्यांनी त्याला समर्थपणे तोंड दिले.

लॅबमध्ये अपुरा कर्मचारी वर्ग होता. त्यात तीन मायक्रोबायोलॉजिस्ट डॉक्टर, मोजकेच तंत्रज्ञ व इतरांचा समावेश होता. दक्षिण गोव्यातील ही एकमेव कोविड लॅब होती. कोविडच्या पहिल्या लाटेवेळी रुग्णांना टीबी इस्पितळातील लॅबमध्ये पाठवले जात होते; पण नंतर जेव्हा रुग्णांचे प्रमाण वाढले तसे डॉक्टरांसह सर्व कर्मचाऱ्यांना खबरदारीचे प्रशिक्षण देण्यात आले. नंतर या लॅबने कोविड पीसीआर चाचणीही सुरू केली व विमानतळ तसेच अन्यत्रच्या चाचण्या तेथे केल्या जाऊ लागल्या. पारंपरिक पद्धतीबरोबरच नवीन तंत्राचा अवलंबही या लॅबमध्ये करण्यात आला. त्यासाठी स्वयंचलित यंत्रणा उभारण्यात आली व त्यातून चाचण्या विनाविलंब होऊन दाखले हाती येऊ लागले. त्यामुळे महिनाकाठी आरटीपीसीआर सोडून अडीच हजारांवर चाचण्या होऊ लागल्या.

डॉ. शेवॉन क्वाद्रुस, डॉ. प्रजय नाईक व डॉ. ऊर्वी कामत या मायक्रो बायोलॉजिस्टसमवेत श्रुतिका बोरकर, वर्धा सावंत व ल्युआने मिनेझिस तसेच 10 टेक्निशियन व तीन डेटा एंट्री ऑपरेटर यांनी या लॅबची धुरा गेली दोन वर्षे सांभाळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT