Datta Damodar Naik Dainik Gomantak
गोवा

Datta Naik Case: दत्ता नायक यांना मोठा दिलासा! आक्षेपार्ह धार्मिक विधान प्रकरणात अखेर सशर्त जामीन

Datta Naik Bail Granted: साहित्यिक दत्ता दामोदर नायक यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजूर केला

Akshata Chhatre

मडगाव: धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी उद्योजक, लेखक दत्ता दामोदर नायक यांना अखेर सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर नायकांना जामीन दिलाय. मंदिरे आणि मठ यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अटकेची तांगती तलवार असणाऱ्या दत्ता नायक यांना जामीन मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

दत्त नाईक यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निकाल दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्षमा जोशी यांनी सोमवारपर्यंत (१३ जानेवारी) राखून ठेवला होता.

शुक्रवारी १० जानेवारी रोजी नायक यांनी काणकोण पोलीस स्थानकावर हजेरी दिली होती आणि यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे चिरंजीव चिराग नायक हे देखील होते. दरम्यान पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला. यासंबंधी नायक यांना विचारले असता, सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आपण कोणतेही भाष्य करू शकत नाही मात्र, आपल्याला काय सांगायचे आहे ते पोलिसांना सांगितले आहे, असे वक्तव्य केले होते.

यापूर्वी गुरुवारी (०९ जानेवारी) न्या. जोशी यांच्यासमोर नायक यांच्या अटकपूर्व जामिन अर्जावरील सुनावणी झाली होती. त्यावेळी नायक यांच्यावतीने बाजू मांडणारे अॅड. क्लिओफात आल्मेदा कुतिन्हो यांनी नायक यांचे वक्तव्य धार्मिक भावना दुखावण्याच्या गुन्ह्याखाली येत नाही, असा दावा केला होता.

धार्मिक भावना दुखावल्याने तक्रार

पर्तगाळ मठ आणि भट-पुरोहित वर्गा विषयी भाष्य केल्याप्रकरणी उद्योजक, लेखक दत्ता नायक यांच्या विरोधात शनिवारी (दि. ४ जानेवारी ) पोलिस तक्रार दाखल करण्यात आली होती. धर्माच्या नावाखाली मठ-मंदिर, पर्तगाळ मठात भरपूर पैसे लुटतात, असे वक्तव्य नायक यांनी एका टीव्हीच्या खासगी मुलाखतीत केले होते. काणकोणनंतर मडगावमधून देखील दत्ता नायक यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

गोवा पुरोहित संघाकडून पोलिस तक्रार

ब्राम्हण समाजाच्या विरोधात दिशाभूल करणारी माहिती लिहल्याप्रकरणी गोवा पुरोहित संघाने देखील उद्योजक, लेखक दत्ता दामोदर नायक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT