Sunil Gudlar Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: लाचखोर निलंबित PI गुडलरसह हुसेनला 3 दिवसांचा रिमांड, जामीन अर्जावर शुक्रवारी निर्णय

Margao Railway Police Station: लाच प्रकरणातील निलंबित पोलिस निरीक्षक सुनील गुडलर आणि पोलिस शिपाई मोहम्मद हुसेन या दोघांच्या जामीन अर्जावर शुक्रवार, २ मे रोजी निवाडा होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव : लाच प्रकरणातील निलंबित पोलिस निरीक्षक सुनील गुडलर आणि पोलिस शिपाई मोहम्मद हुसेन या दोघांच्या जामीन अर्जावर शुक्रवार, २ मे रोजी निवाडा होणार आहे. या दोघांच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.  

अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश विजया आंब्रे यांच्या न्यायालयात बुधवारी  हा जामीन अर्ज सुनावणीस आला असता, निवाड्याची प्रत तयार झाली नसल्याने पुढील तारीख दिली. 

बेळगाव येथील एका मटण व्यापाऱ्याला गोव्यात मांसपुरवठा केल्याच्या खोट्या प्रकरणात फसवून त्याच्याकडून दोन लाखांची लाच व दरमहा २५ हजार रुपये हफ्त्याची मागणी केल्याप्रकरणी या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  सोमवार, २१ रोजी अटक केली होती.

३० मार्च रोजी गोवा एक्स्प्रेस रेल्वेने मडगावात आलेले बीफ रेल्वे पोलिसांनी जप्त केले होते. नंतर बेळगाव येथील एका मटण विक्रेत्याला धमकावून त्याच्याकडून लाच मागण्याचा प्रकार घडला होता. त्या व्यापाऱ्याने याबाबत ‘एसीबी’कडे तक्रार केली होती.

‘या’ कारणास्तव जामिनाला आक्षेप

मागच्या सुनावणीवेळी या जामीन अर्जाला सरकार पक्षाने विरोध करताना गुडलरवर यापूर्वीही दोन गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याचे सांगताना, त्याची पोलिस कोठडीत चौकशी करणे गरजेचे असल्याचे म्हटले होते.

मोहम्मद हुसेन  हा तपासकामात सहकार्य करीत नाही. त्यामुळे त्याच्या चौकशीसाठी त्याची कोठडी आवश्यक आहे. तो पोलिस शिपाई असल्याने जामीन मिळाल्यास साक्षीदारावर दबाव आणू शकतो, तक्रारीत फेरफार करू शकतो. सबब त्याला जामीन देऊ नये, असे  म्हणणे न्यायालयात मांडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: गोमंतकीयांना उत्तम आरोग्‍य, सुख, समृद्धी लाभो! आरोग्‍यमंत्र्यांचे श्री विठूरायाला साकडे

Goa Fraud: मोबाईल लिंकवर पैसे पाठवले, नंबर झाला 'नॉट रिचेबल'; क्रिप्टोतून जादा परताव्याच्या आमिषाने 3.35 लाखांचा गंडा

Sal Electricity Problem: अख्खी रात्र काळोखात! गोव्यातील 'या' गावामध्ये 15 तास वीज गायब; नागरिक हैराण

Porvorim Road: जुना रस्ता सुस्थितीत, नव्या रस्त्याची चाळण! पर्वरीतील सावळागोंधळ, पावसाने खड्ड्यांचे साम्राज्य

Mega Project Goa: गोव्यात येणार 800 कोटींचा मेगा प्रोजेक्ट! पाण्याची कमी तरी बड्या प्रकल्पांना पायघड्या; अजून 2 गृहप्रकल्प होणार

SCROLL FOR NEXT