Arrested Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: मडकई आयडीसीजवळ म्हार्दोळ पोलिसांची कारवाई; गांजा बाळगल्याप्रकरणी एकजण गजाआड!

Mardol Police: म्हार्दोळ पोलिसांनी मडकई येथील आयडीसीजवळ 241 ग्राम गांजा बाळगल्याप्रकरणी कारवाई केली आहे.

Manish Jadhav

म्हार्दोळ पोलिसांनी मडकई येथील आयडीसीजवळ 241 ग्राम गांजा बाळगल्याप्रकरणी कारवाई केली आहे. पोलिसांनी हेरंब दिलीप नाईक या 22 वर्षीय तरुणाच्या मुसक्या आवळल्या. हेरंब हा दासोळवाडा, कुंडई येथील रहिवासी आहे. याशिवाय, त्याच्याकडून स्कूटरही जप्त करण्यात आली. पोलिस निरिक्षक योगेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षख अभिलाष नाईक यांनी ही कारवाई केली.

दरम्यान, म्हार्दोळ पोलिसांना मडकई येथील आयडीसीजवळ शुक्रवारी (16 ऑगस्ट) सकाळी 5.40 वाजण्याच्या सुमारास एक तरुण स्कूटर घेऊन फिरताना दिसला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असताना त्याच्याकडून तब्बल 241 ग्राम गांजा आढळून आला. पोलिसांनी त्याची स्कूटरही जप्त केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या गांजाची किंमत तब्बल 24 हजार 100 रुपये आहे. म्हार्दोळ पोलिस (Police) याप्रकरणी अधिक तपास करतायेत.

रशियन नागरिकाला अटक!

अमली पदार्थ गांजा जवळ बाळगल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी रशियन नागरिकाला अटक केली. बुधवारी (14 ऑगस्ट) पेडणे तालुक्यातील सातेरी मंदिराजवळ ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथक, पणजी गोवा यांच्या वतीने मराठावाडा, मांद्रे येथील सातेरी मंदिराजवळ छापा टाकला.

पथकाने 42 वर्षीय रशियन नागरिक कोंस्टाटीन मार्जर्ली याला गांजा हा अमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी अटक केली. त्याच्याकडे दोन प्रकारचे अमली पदार्थ आढळून आले. 29 व 500 ग्रॅम वजनाचा एक लाख 66 हजार किमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT