Subhash Velingkar Dainik Gomantak
गोवा

Marathi Language: मराठी राजभाषेसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार! निर्धार समितीचे खरे कार्य आता; प्रा. सुभाष वेलिंगकर

Subhash Velingkar: सुकाणू समितीची बैठक होणार असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना निवेदन देण्यात येईल, अशी माहिती निर्धार समितीचे राज्य निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी दिली.

Sameer Panditrao

पणजी: मराठी राजभाषा निर्धार समितीच्या मेळाव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळेपर्यंत गप्प न बसण्याचा निर्धार राजधानीतून केल्यानंतर समितीच्या पुढील कृतीवर आता सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

केवळ मराठीप्रेमींना हाक देऊन न थांबता समितीचे खरे कार्य आता सुरू झाले असून पुढील आठवड्यात सुकाणू समितीची बैठक होणार असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना निवेदन देण्यात येईल, अशी माहिती निर्धार समितीचे राज्य निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी दिली.

मराठी राजभाषा निर्धार समितीचे राज्य निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी आयोजित केलेल्या सोमवारी आयोजित निर्धार मेळाव्याला मराठीप्रेमींची मोठी उपस्थिती लाभली.

प्रा. वेलिंगकर यांनी स्पष्ट केले की, पुढील आठवड्यात सुकाणू समितीची बैठक आयोजित केली जाणार असून, या बैठकीत तालुकास्तरीय समित्यांचे गठन करण्यात येईल. या समित्या तीन महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे लक्ष्य असून, प्रत्येक तालुक्यात ५० ते १०० मराठीप्रेमींना एकत्रित करून व्यापक जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. कलाकार, नाट्यसंस्था, संगीतकार, कवी, लेखक, महिला, युवक यांचा सक्रिय सहभाग असणार आहे.

मुख्यमंत्र्यांना भेटणार!

समितीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याची मागणी करणार आहे. तालुका समित्या स्थापन झाल्यावर पंचायत पातळीवर प्रचार आणि जनजागृती मोहीम सुरू केली जाणार आहे. राज्यातील १७० पंचायतांमध्ये मराठीचा प्रसार करण्यात येईल, साष्टी विभाग वगळता सर्व भागांमध्ये जागरूकता वाढवली जाणार आहे. साष्टीमध्ये मराठी प्रेमी कमी असल्याने त्यांना जवळील बैठकांमध्ये बोलावले जाईल, असेही प्रा. वेलिंगकर यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

Goa School Closed: गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले; शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT