Marathi Films At IFFI 2026 Dainik Gomantak
गोवा

Marathi Films At IFFI 2026: इफ्फीत मराठी सिनेमांचा डंका! भारतीय पॅनोरमात 7 चित्रपटांची निवड; 'आदि अनंत', 'देऊळ बंद 2'ची पर्वणी

International Film Festival Of India: आशयघन कथानक, वास्तववादी मांडणी आणि साहित्याशी असलेली घट्ट नाळ यामुळे मराठी चित्रपटसृष्टीने भारतीय चित्रपटविश्वात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: आशयघन कथानक, वास्तववादी मांडणी आणि साहित्याशी असलेली घट्ट नाळ यामुळे मराठी चित्रपटसृष्टीने भारतीय चित्रपटविश्वात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या समृद्ध परंपरेचा गौरव करण्यासाठी यंदाच्‍या इफफीत मराठी चित्रपटांना विशेष स्थान देण्यात आले आहे. भारतीय पॅनोरमा विभागात सात मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. भारतीय पॅनोरमाच्या कथापट विभागात महेश लिमये दिग्दर्शित ‘आदि अनंत’ या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा समावेश आहे.

मुख्य प्रवाहातील चित्रपट विभागात प्रवीण तरडे लिखित व दिग्दर्शित ‘देऊळ बंद : २’ आणि समीर तिवारी दिग्दर्शित ‘बाप्या’ हे चित्रपट दाखवले जातील. जिजीविषा काळे दिग्दर्शित ‘तिघी’ हा आणखी एक उल्लेखनीय चित्रपट आहे. कथाबाह्य चित्रपट विभागात अमित पाटकर दिग्दर्शित ‘शिक्षा’, संतोष डावखर दिग्दर्शित ‘आभाळवृक्ष’ आणि निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘चांदोबा’ या तीन मराठी चित्रपटांची निवड झाली आहे.

भारतीय पॅनोरमाबाहेरही मराठी चित्रपटाला स्थान मिळाले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक दीपक गावडे यांच्या ‘तू आहेस ना’ या चित्रपटाचे गाला प्रीमियर विभागात प्रदर्शन होणार आहे. तसेच चंद्रकांत गायकवाड दिग्दर्शित ‘देवखेळ’ या वेबमालिकेची इफ्फीच्या सर्वोत्कृष्ट वेबमालिका पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यामुळे मराठी कथनाला चित्रपटांसह वेबमालिकांच्या माध्यमातूनही महोत्सवात व्यासपीठ मिळाले आहे.

‘साधी माणसं’चे पुनर्संचयित प्रदर्शन

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त इफ्फीत त्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. यानिमित्ताने १९६५ मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा ‘साधी माणसं’ हा चित्रपट राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानांतर्गत भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने पुनर्संचयित केलेल्या स्वरूपात दाखविण्यात येईल. या प्रदर्शनातून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीचा गौरव केला जाणार आहे.

नाना पाटेकरना आदरांजली

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या प्रभावी अभिनयाचा ठसा उमटविणारे अभिनेते नाना पाटेकर यांनाही इफ्फीत विशेष आदरांजली वाहण्यात येणार आहे. त्यांचा ‘दीक्षा’ हा हिंदी चित्रपट महोत्सवात प्रदर्शित केला जाईल. तसेच मिरामार समुद्रकिनाऱ्यावर त्यांच्या गाजलेल्या ‘नटसम्राट’ या मराठी चित्रपटाचे खुल्या मैदानात विशेष प्रदर्शन होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump Assassination Plot: मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाला 27 वर्षांची कठोर शिक्षा; अमेरिकन कोर्टाचा मोठा दणका

School Harassment Case: शिक्षकाचे अल्पवयीन विद्यार्थिनीच्या मागे एकतर्फी प्रेमाचे खूळ; डिचोलीत संताप, संशयित शिक्षक अटकेत

Daily Horoscope: धनवान होण्याचा योग! जुनी गुंतवणूक देणार भरमसाठ रिटर्न, 'या' राशींसाठी बुधवार आर्थिक लाभाचा

Colva Gang War: दक्षिण गोव्यावर वर्चस्व कोणाचे? 'वॉल्टर' आणि 'तलवार' गँगमधील संघर्षातून कोलव्यात जीवघेणा हल्ला; मुख्य संशयितासह चौघे अटकेत

Goa Politics: 'परकीय शक्तींच्या मदतीने देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न'; CM सावंत यांचा विरोधकांवर आरोप

SCROLL FOR NEXT