Goa Accident News Dainik Gomantak
गोवा

Goa News: न्हावेली साखळी येथे अपघातातील जखमी मुलाचे निधन; वाचा गोव्यातील दिवसभरातील घडामोडी

Today's Marathi News: मराठीमध्ये जाणून घ्या गोव्यातील ताज्या घडामोडी

Akshata Chhatre

न्हावेली साखळी येथे अपघातातील जखमी मुलाचे निधन

न्हावेली-साखळी येथे बुधवारी संध्याकाळी ट्रक आणि मोटरसायकलच्या अपघातात गंभीर जखमी झालेला १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचे आज सकाळी बांबोळी येथील गोमेकॉ रुग्णालयात उपचारादरम्यान निधन. डिचोली पोलिसांकडून ट्रकचालकाविरोधात गुन्हा नोंद.

रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम उद्ध्वस्त

भारताने पाकिस्तानवर हल्ला करून प्रसिद्ध रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम उद्ध्वस्त केले. आज स्टेडियमवर पीएसएलचा सामना होणार होता.

"शिरगाव चेंगराचेंगरीबद्दल शुक्रवारी माहिती देणार" मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

शिरगाव चेंगराचेंगरीचा आज संध्याकाळपर्यंत तथ्य शोधण्याचा अहवाल येईल. उद्या त्याबद्दल माहिती देणार: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

"जास्त दृश्यमानता आणि पर्यटकांची गर्दी असलेल्या ठिकाणी सुरक्षा उपाय वाढवणार" डीजीपी आलोक कुमार

कालच्या झालेल्या कारवाईनंतर आम्ही जास्त दृश्यमानता आणि पर्यटकांची गर्दी असलेल्या ठिकाणी सुरक्षा उपाय वाढवणार.मुख्यमंत्र्यांच्या सूचनांनुसार दिवस आणि रात्री सुरक्षा वाढवण्यात येईल. डीजीपी आलोक कुमार

शिरगाव चेंगराचेंगरीत माजी अध्यक्षांचा हात?; विद्यमान समितीचा दावा

शिरगाव दुर्घटनेमागे देवस्थानच्या माजी अध्यक्षांचा हात असू शकतो. विद्यमान समितीचा दावा. सत्यशोधन समितीने चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी.

श्रवण बर्वे खून प्रकरणी आरोपींना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

श्रवण बर्वे खून प्रकरणी वासुदेव वझरेकर, देविदास बर्वे आणि उदय बर्वे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (GSIDC) ची २०५ वी संचालक मंडळ बैठक झाली, ज्यामध्ये उपाध्यक्ष आणि आमदार श्री केदार नाईक, व्यवस्थापकीय संचालक श्री हरीश अडकोणकर आणि सहकारी संचालकांचा समावेश होता.

उत्तरकाशीमध्ये हेलिकॉप्टर कोसळला; ५ पर्यटकांचा मृत्यू

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगानणीजवळ हेलिकॉप्टर कोसळून पाच जणांचा मृत्यू. बचावकार्य सुरू.

एफडीएकडून अस्वच्छ स्वयंपाकघरांची सखोल तपासणी

रिचर्ड नोरोन्हा डिसिगंटेड ऑफिसर नॉर्थ गोवा, राजाराम पाटील सीनियर फूड सेफ्टी ऑफिसर, लेनिन देसा, अमित मांद्रेकर आणि स्नेहा गौडे यांच्या एफडीए पथकाने संचालक श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सुकुर आणि करसवाडा येथील ७ युनिट्सची पुन्हा तपासणी केली. एफडीएच्या निर्देशांचे पालन करणाऱ्या २ युनिट्सना पुन्हा काम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. दम बिर्याणी बनवण्यात गुंतलेल्या २ अस्वच्छ युनिट्सना कोलवाळ येथील कामकाज बंद करण्याचे निर्देश देण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: गोव्यात विजांच्या कडकडाटासह बरसणार मुसळधार सरी, आयएमडीने जारी केला 'नाऊकास्ट' इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

PM मोदींच्या दौऱ्यासाठी काणकोणमध्ये 3 हेलिपॅड सज्ज! 77 फूट उंच श्रीरामांच्या मूर्तीचे करणार अनावरण

26 नोव्हेंबरला दुर्मिळ 'लक्ष्मी नारायण योग'! 'या' 4 राशींच्या लोकांवर होणार धन वर्षा, करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचा योग; उत्पन्नाचे स्रोत वाढणार

विकेट पडताच टीव्ही बंद करायचे, 'या' महान भारतीय क्रिकेटपटूला मुलगा मानायचे, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर 'ती' खास पोस्ट चर्चेत!

Goa Politics: ''भाजपने यादी जाहीर केल्यावरच आम्ही उमेदवार देऊ!'', ZP Electionसाठी पाटकरांचा 'वेट ॲण्ड वॉच'चा फॉर्म्युला

SCROLL FOR NEXT