Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa News: नोकरी घोटाळ्याप्रकरणी पीडितांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी.

Manish Jadhav

नोकरी घोटाळ्याप्रकरणी पीडितांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!

राज्यात गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या नोकरी घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची पीडितांनी भेट घेतली. या भेटीत पीडितांनी मुख्यमंत्र्यांसमोर त्यांची बाजू मांडली आणि आरोपी पूजा नाईक हिला सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी त्यांनी कसे पैसे दिले, याची माहिती दिली.

मानव तस्कर प्रकरणी गोवा पोलिसांची मोठी कारवाई! दोन मुलींची केली सुटका; तस्करांना ठोकल्या बेड्या

गोवा क्राईम ब्रँच आणि मानवी तस्करी विरोधी युनिटची नोडल एनजीओ यांच्या संयुक्त कारवाईत म्हापसा येथील एका हॉटेलमधून दोन मुलींची सुटका करण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणी दोन मानवी तस्करांना (Traffickers) अटक करण्यात आली आहे.

आयएएस अधिकारी निखिल देसाईंकडून पूजा नाईकला मानहानीची नोटीस

गोव्यात गेल्या काही दिवसांपासू राज्याच्या राजाकराणात नोकरी घोटाळा प्रकरण चांगलंच गाजत (Cash-for-Job) आहे. यातच, या घोटाळ्यातील मुख्य आरोपी पूजा नाईक हिने केलेले आरोप आयएएस (IAS) अधिकारी निखिल देसाई यांना चांगलेच भोवले आहेत. पूजा नाईकने आपल्यावर खोटे आणि बदनामीकारक आरोप केल्याबद्दल आयएएस अधिकारी निखिल देसाई यांनी तिला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

मोपावरुन नवी मुंबई विमानसेवा लवकरच होणार सुरु!

अकासा एअर आणि इंडिगो या दोन प्रमुख विमान कंपन्यांनी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मोपा) येथून नव्याने उद्घाटन झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थेट उड्डाणे सुरु करण्याची घोषणा केली आहे. ही सेवा 25 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही थेट जोडणी अत्यंत सोयीची ठरणार आहे.

मोले चेकपोस्टवर पुन्हा बेकायदेशीर गोमांस पकडले, चालक पोलिसांच्या ताब्यात

मोले चेकपोस्टवर बेकायदेशीररित्या घेऊन जाणारे गोमांस कारसहीत पोलिस व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडले. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

एकाच खोलीत बाप-लेकाचा संशयास्पद मृत्यू! डिचोली परिसरात खळबळ; मुलाच्या नाकातोंडातून रक्तस्राव, गूढ वाढले

Rashi Bhavishya: ग्रहांचा धमाका! मंगळवार घेऊन येतोय 'शुभवार्ता'; वाचा संपूर्ण राशिभविष्य

Goa Budget Session 2026: गदारोळात गोवा विधानसभा अधिवेशनाचा समारोप! अर्थसंकल्प मंजूर; आचारसंहितेमुळे 7व्या दिवशीच वाजले सूप

VIDEO: ''माझी इच्छा आहे की, एक दिवस त्यानं माझ्या जागेवर यावं अन्...'', कॅप्टन कूलच्या 'त्या' पोस्टवर काय म्हणाला गंभीर?

Middle East War: "इराण सोडण्याच्या घाईत जीव धोक्यात घालू नका!" भारतीय दूतावासाकडून नवी नियमावली जारी; सीमा ओलांडण्यावर कडक बंदी

SCROLL FOR NEXT