MLA Digambar Kamat  Dainik Gomantak
गोवा

Goa News: ''मी मागचाही विचार करत नाही, आणि...'', मंत्रिमंडळ फेरबदलाच्या मुद्यावर आमदार कामतांची प्रतिक्रिया; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Marathi Breaking News Goa: जाणून घ्या गोव्यातील घडामोडी. राजकारण, क्रीडा, मनोरंजन, शिगमोत्सव आणि इतर

Akshata Chhatre

''मी मागचाही विचार करत नाही आणि...''; मंत्रिमंडळ फेरबदलाच्या मुद्यावर आमदार कामतांची प्रतिक्रिया

मी मागचाही विचार करत नाही आणि पुढचाही विचार करत नाही, मी जिथे आहे तिथेच आहे, मंत्रिमंडळ फेरबदलाच्या मुद्यावर आमदार दिगंबर कामत यांनी प्रतिक्रिया दिली.

गोवा विद्यापीठात 'यूपीएससी' चे वर्ग सुरु, पदवीधर गोमंतकीय विद्यार्थ्यांना संधी

गोवा विद्यापीठात यूपीएससीचे वर्ग सुरु करण्यात आले आहे. पदवी मिळालेल्या गोमंतकीय विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे.

Mandovi River Goa: पोटाची ‘खळगी’ भरण्यासाठी मांडवी पुलावर चाललेली जीवघेणी कसरत...!

Rent- a- Cab: अवैधपणे रेंट अ कारचा व्यवसाय करणारे पोलिसांच्या ताब्यात

मोपा विमानतळावरील भाडी मारणाऱ्या रेंट कार बंदी घातली आहे ,आता रेंट कार धारगळ सुकेकुळण येथे पेट्रोल पंप हॉटेलकडे राहून भाडी मारतात, ट्रॅफिक पोलिसांनी एक गाडी पकडली ,दोन वाहने पोलीस स्टेशनवर आणली.

Goa Politics: मुख्यमंत्री सावंत यांनी नवी दिल्ली येथे घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी नवीन गुन्हेगारी कायद्यांच्या अंमलबजावणीतील राज्याची प्रगती, खाण क्षेत्रातील विकास यासह प्रमुख मुद्द्यांवर गृहमंत्री यांना माहिती दिली आणि प्रशासकीय आणि विकासात्मक उपक्रम पुढे नेण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन घेतले.

Goa News: मांद्रे येथील माजी सरपंच, समाजसेवक प्रशांत (बाळा) नाईक यांचा सत्कार

मांद्रे येथील माजी सरपंच, समाजसेवक प्रशांत (बाळा) नाईक यांचा श्रीमती विद्या गड सरकारी प्राथमिक शाळा तळेवाडा केरीच्या मुख्याध्यापिका दत्ताराम नाईक एस.एम.सी. चेअरमन आणि इतरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

Air India Express: एअर इंडिया एक्सप्रेस मोपाहून करणार 5 मोठी उड्डाणं

एअर इंडिया एक्सप्रेस १५ एप्रिल २०२५ पासून मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ-मोपा येथून सेवा सुरू करणार आहे, ज्याद्वारे बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, इंदोर आणि पटना येथे थेट उड्डाणे सुरू होतील.

Mandrem News: मांद्रे येथील जुनसवाडा किनारी भागात लोखंडी पुलाला देखरेखीची गरज

साधारण तीन वर्षांपूर्वी मांद्रे येथील जुनसवाडा किनारी भागात लोखंडी पूल बांधून त्याचं इनोग्रेशन करण्यात आलं होतं. या लोखंडी पूलसाठी कोट्यवधी पैसे खर्च करण्यात आले होते. एवढे पैसे खर्च करून हा लोखंडी पूल बांधण्यात आला पण पूल बांधल्यापासून आतापर्यंत त्याची कोणीही देखरेख न केल्याने या लोखंडी पूलची परिस्थिती आता बिकट झालेली आहे. संबंधित विभागाने येऊन या पुलाची पाहणी करावी आणि पूल दुरुस्त करवून द्यावा अशी मागणी स्थानिक करतायत.

Panjim News: पाटो पणजी येथे सेंट्रल लायब्ररी समोर प्रकल्पाचे काम; लोकांना गाड्या पार्क करण्यास त्रास

मागील २ वर्षांपासून पाटो पणजी येथे संस्कृती भवन (सेंट्रल लायब्ररी) समोर एक मोठ्या प्रकल्पाचे काम चालू आहे. त्या प्रकल्पाचे सामान समोरच असलेल्या पार्किंग लॉट मध्ये ठेवलेले असल्याने पणजीत कामानिमित्त येणाऱ्या लोकांना गाड्या पार्क करण्यास त्रास होतो.

Goa Traffic: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 आता सर्व वाहतुकीसाठी खुला

गेल्या आठवड्यात जड वाहनांसाठी तात्पुरते बंद असलेला ओ'कोक्विरो जंक्शन ते नेक्सा शोरूम पर्वरी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ आता सर्व वाहतुकीसाठी खुला आहे. आजपासून ओ'कोक्विरो जंक्शन ते म्हापशाच्या दिशेने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर स्थानिक बसेस दररोजप्रमाणे धावतील. स्थानिक बस ऑपरेटर्सनी याची नोंद घ्यावी. एसपी ट्रॅफिक

Goa Entertainment: रुद्रेश्वर पणजीचे "मिडीआ" नाटक महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत प्रथम

रुद्रेश्वर पणजीचे "मिडीआ" नाटक महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत प्रथम. गंगाराम नार्वेकर उत्कृष्ट दिग्दर्शक, वैष्णवी पै काकोडेला उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक, रंगभूषेसाठी एकनाथ नाईक यांना पहिले बक्षिस, नेपथ्यासाठी योगेश कापडी यांना तृतीय पारितोषीक, मनुजा नार्वेकर लोकुर यांना अभिनयाचे प्रशस्तिपत्र

Goa Shigmotsav: सर्वणची घोडेमोडणी उत्साहात संपूर्ण

सर्वणची घोडेमोडणी उत्साहात. घोडे नृत्याचा आस्वाद घेण्यासाठी उसळली होती गर्दी. मध्यरात्री भक्तांनी केले अग्नीदिव्य.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT