गोवा

Goa News: वेळगे येथे डोंगराला आग, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Marathi News 8 January 2025: गोव्यात राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी

Akshata Chhatre

वेळगे येथे डोंगराला आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम सुरु

वेळगे येथे डोंगराला आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाहीये. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे काम सुरु आहे.

"टूलकिटचे मूळ शोधा" कॅबिनेट मंत्र्यांची मागणी

सरकारची बदनामी करणाऱ्यांमध्ये बाहेरच्या आणि आतल्या लोकांचा समावेश. लवकरात-लवकर तपासणी व्हावी अशी मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

गेल्या दोन वर्षात वीज खात्यात 5 हजार कोटींच्या कामाचे टेंडर, वीजमंत्री ढवळीकरांची माहिती

गेल्या दोन वर्षात वीज खात्यात 5 हजार कोटींच्या कामाचे टेंडर. बार्देश तालुक्यातील वीज तुटवड्यावर मात करण्यासाठी सब स्टेशनच्या अपग्रेडेशनचे काम सुरु. ट्रान्सफोर्मरही बदलण्याचे कामही वेगात सुरु. वीजमंत्री सुदीन ढवळीकरांची माहिती.

"नोकरी भरती प्रक्रिया सुरूच राहणार"

सरकारी नोकऱ्यांची भरती प्रक्रिया पुढील दोन महिने सुरू राहणार. एप्रिल महिन्यांनंतर नियुक्त्या केल्या जातील, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती.

सुलेमान खान प्रकरणी अमित पालेकर यांना 'पोलिसांचा बुलावा'

सुलेमान ऊर्फ सिद्दीक खान प्रकरणी आपचे अध्यक्ष ॲड अमित पालेकर यांना आज जुने गोवा पोलीस स्थानकात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नैसर्गिक स्रोतांमधील पाण्याच्या वापरात ३० लाख घन मीटरने वाढ

गेल्या वर्षभरात गोव्यातील नैसर्गिक स्रोतांमधील पाण्याच्या वापरात ३० लाख घन मीटरने वाढ झाली आहे.

गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

हणजूण पोलिसांनी रोहन वर्मा (२३, पर्रा) याला ९० हजार रुपये किमतीचा ९०० ग्रॅम गांजा बाळगल्याप्रकरणी अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: "कर्ज काढून सण साजरे करू नका", अर्थसंकल्पावर भाष्य करताना युरी आलेमाव यांचा सरकारला टोला

Goa: "सुरक्षारक्षकांच्या वेतनावरील 18% जीएसटी बंद करणार" CM प्रमोद सावंतांचे विधानसभेत आश्‍‍वासन

Goa Rain Update: गोवेकरांनो सावधान! पावसाचा जोर आणखी वाढणार, हवामान विभागाकडून 'रेड अलर्ट' जारी

Aggressive Dogs Ban: रॉटविलर, पिटबुलवर बंदीचा मार्ग मोकळा! विरोधकांचा विरोध झुगारत दोन विधेयकांना मंजुरी

Goa Assembly: 1972च्या सर्व्हेत नोंद असूनसुद्धा बेकायदा राहिलेली घरं आता 'कायदेशीर'; महसूल,पंचायत खात्‍याकडून मिळणार प्रमाणपत्रे; CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT