Alka Kubal Dainik Gomantak
गोवा

Alka Kubal: 'गोव्याच्या मातीत अनेक कलाकार जन्माला आले', मराठी अभिनेत्री अलका कुबल यांचे गौरोद्गार

Goa KalaRang 2024 Festival: मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज आणि प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनी गोव्याबद्दल गौरोद्गार काढले आहेत. गोव्याच्या मातीतून अनेक मोठमोठे कलाकार जन्माला आल्याचे अलका कुबल म्हणाल्या.

Manish Jadhav

गोवा हे कलाकारांची भूमी आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत गोव्यातील कलाकारांनी आपली वेगळी छाप सोडली आहे. खासकरुन, मराठी सिनेसृष्टीचा विचार करायचा झाल्यास आपल्या ध्यानी वर्षा उसगावंकर यांचे नाव लगेच येते. वर्षा उसगावंकर यांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर एक वेगळीच छाप सोडली.

यातच आता, मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज आणि प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनी गोव्याबद्दल गौरोद्गार काढले आहेत. गोव्याच्या मातीत अनेक मोठमोठे कलाकार जन्माला आल्याचे अलका कुबल म्हणाल्या. एवढ्यावरच न थांबता हा गोव्याच्या मातीला परमेश्वराने दिलेला आशीर्वाद असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

कला आणि संस्कृती संचालनालय रवींद्र भवन, मडगाव आणि कलांगण मडगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने रवींद्र भवनात आयोजित कलारंग 2024 कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

अलका पुढे म्हणाल्या, ''कार्यक्रमानिमित्त मला गोव्याला यायला आवडते. मी आणि वर्षाने अनेक चित्रपटात काम केले आहे. गोवा सरकारने अशाप्रकारचे चांगले कार्यक्रम घडवून आणावेत.''

यावेळी कार्यक्रमासाठी, सावंत सरकारमधील कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, मडगावचे आमदार दिगंबर कामत (Digambar Kamat), ख्यातनाम गायिका हेमा सरदेसाई, गोव्याची लेक आणि मराठी अभिनेत्री वर्षा उसगावंकर इत्यादी उपस्थित होते.

गोव्याच्या लेकीचे गौरोद्गार

गोव्यात रवींद्र भवनासारख्या वास्तू आणखी उभारण्यात याव्यात. ही गोव्यासाठी सकारात्मक बाब आहे. आता प्रत्येक कलाकाराची जबाबदारी आहे की, त्यांनी गोव्याचे नाव मोठे केले पाहिजे, असे गोव्याची (Goa) लेक आणि मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावंकर म्हणाल्या. एवढचं नाहीतर वर्षा उसगावंकर यांनी यावेळी कोकणीतून गीतही गायले. गोव्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे कार्यक्रमासाठी प्रेक्षकांची उपस्थिती कमी होती. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणादरम्यान पावसाचा उल्लेख केला. पण वर्षा उसगावंकर यांनी आपल्या नावाचा उल्लेख करत उपस्थितीच्या चेहऱ्यावर हसू आणले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT