Mapusa Traffic Cell | Traffic Violations File Photo
गोवा

Mapusa Traffic Cell : म्‍हापसा वाहतूक पोलिस ‘ॲक्‍शन मोड’वर! वाहनचालकांना शिकवले नियम

मोहीम तीव्र; दिवसभरात १२०पेक्षा अधिक चालकांना दिला तालांव

दैनिक गोमन्तक

Mapusa Traffic Cell : अपघातातील वाढत्‍या बळींची संख्‍या रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. आज बुधवारी म्हापशात वाहतूक पोलिस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी म्हापसा वाहतूक पोलिसांसह रस्त्यावर उतरून उल्लंघनकर्त्यांना चलन दिले. शिवाय वाहनचालकांमध्ये जागृती करीत नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

दरम्‍यान, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जवळपास १२० पेक्षा अधिक वाहनचालकांना आज दिवसभरात म्‍हापसा शहरात चलन देण्‍यात आले. यावेळी म्हापसा वाहतूक पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत विशेष मोहिमेवेळी म्हापसा गांधी चौकात हजर होते.

शाळा, महाविद्यालयांमध्‍ये जनजागृती

पोलिसांकडून सर्व वाहने तपासली जात आहेत. केवळ बाहेरील वाहनांनाच लक्ष्य केले जात नाहीय. सध्या विद्यार्थीसुद्धा हेल्मेट वापरताना दिसताहेत. कारण हेल्मेट न वापरल्यास काय घडू शकते या परिणांमाची प्रत्येकाला जाणीव आहे. तरीही काहीजण उल्लंघन करतातच. त्यांच्यामध्ये जागृती करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

शिवाय पोलिसांकडून शाळा, महाविद्यालयांत वेळोवेळी जागृती केली जाते, असे वाहतूक पोलिस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी सांगितले. दरम्यान, या मोहिमेवेळी ज्‍यांना चलन देण्‍यात आले, त्‍यातील बहुतांशजण हेल्मेट परिधान न केलेले होते. शिवाय काही बसचालक व वाहक हे वाहतूक गणवेशाशिवाय वाहतूक करताना आढळले.

वाहतूक सेंटिनल योजना पोलिस मुख्यालयाकडून मंजूर झाली असून येत्या काही दिवसांत तिची अंमलबजावणी पुन्‍हा सुरू केली जाईल. या योजनेच्या नवीन स्वरूपाविषयी माध्यमांना लवकरच माहिती दिली जाईल.

- सिद्धांत शिरोडकर, वाहतूक पोलिस उपअधीक्षक

हेल्‍मेट, सीट बेल्‍टचा वापर करा; नो एंट्रीतून प्रवास टाळा

  • वाढते अपघातबळीचे मुख्य कारण वाहतूकचालकांचा निष्काळजीपणा आहे. अनेकजण हेल्मेट घालत नाहीत, सीट बेल्ट न वापरणे, नो एंट्रीतून वाहन नेणे अशा नियमांचे सर्रास उल्लंघन करतात.

  • पोलिसांकडून उल्लंघनकर्त्यांना वेळोवेळी चलन दिले जाते. इतके करूनही अपघातबळी जातच आहेत. अशावेळी वाहतूक पोलिसांनी आता रस्त्यावर उतरून चालकांमध्ये नव्याने जागृती करण्याचे ठरविले आहे.

  • चलनासोबतच आम्ही वाहनचालकांना शिक्षित करण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण अनेकदा आपल्या चुकीमुळे एका निष्पाप माणसाला प्राण गमवावा लागतो. हे प्रकार घडू नयेत यासाठीच ही विशेष जागृती मोहीम असल्याचे शिरोडकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif: भारताला शत्रू म्हटले, युद्ध जिंकल्याचा केला दावा, शेवटी शांततेसाठी मागितली भीख; पाकच्या पंतप्रधानांचा युएनमध्ये थापांचा पाऊस

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT