Mapusa Theft News Dainik Gomantak
गोवा

Mapusa Theft: पुन्हा त्याच ठिकाणी चोरी! दिवसाढवळ्या दुचाकी लंपास, म्हापसा बनतंय का चोरट्यांचे राज्य?

Mapusa Theft News: म्हापसा शहरात दिवसाढवळ्या वाहन चोरीचा एक गंभीर प्रकार समोर आला आहे

Akshata Chhatre

म्हापसा: गोव्यात वाढत्या गुन्हेगारीचा आलेख चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. म्हापसा शहरात दिवसाढवळ्या वाहन चोरीचा एक गंभीर प्रकार समोर आला आहे. येथील तळीवाडा परिसरात असलेल्या एका प्रसिद्ध वित्तीय संस्थेच्या कार्यालयासमोरून कर्मचाऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली.

ही घटना शुक्रवारी, १२ सप्टेंबर रोजी घडली. मुथूट फायनान्स कंपनीच्या गोवा विभागातील कनिष्ठ गोल्ड ऑडिटर नागप्पा मनगुली हे आपल्या दैनंदिन कामासाठी म्हापसा येथील शाखेत आले होते. सकाळी ९ वाजता त्यांनी आपली जीए ०८ एजी ९२४५ क्रमांकाची दुचाकी नेहमीप्रमाणे कार्यालयाच्या इमारतीबाहेर पार्क केली. दिवसभर काम संपवून सायंकाळी ६.३० वाजता ते बाहेर पडले असता, त्यांना आपली दुचाकी त्या जागेवर दिसली नाही. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ते हादरले आणि त्यांनी तातडीने परिसराची पाहणी केली.

सीसीटीव्हीमध्ये गुन्हेगार कैद

सुदैवाने, ही संपूर्ण चोरीची घटना शेजारील एका इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे. या फुटेजमध्ये एक व्यक्ती मनगुली यांची दुचाकी घेऊन जाताना दिसत आहे. ही बाब लक्षात येताच मनगुली यांनी तात्काळ म्हापसा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे. आजूबाजूच्या परिसरात दुचाकीचा शोध घेण्याचे प्रयत्न पोलिसांनी केले आहेत, मात्र अद्याप दुचाकी सापडलेली नाही.

पुन्हा त्याच ठिकाणी चोरी, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीही याच ठिकाणी एका दुचाकीची चोरी झाली होती. ती घटनाही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती आणि पोलिसांनी दोन स्थानिक तरुणांना अटक केली होती. एकाच ठिकाणी पुन्हा अशा प्रकारे चोरीचा प्रकार घडल्याने पोलिसांच्या गस्तीत वाढ करून अशा घटनांना आळा घालावा, अशी मागणी आता स्थानिक रहिवासी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT