Mapusa  Dainik Gomantak
गोवा

Mapusa News : गिरीत मोरांचे अस्तित्व धोक्यात; शेतजमिनीत सुरू असलेल्या विकासकामांचा परिणाम

Mapusa News : या परिसरात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकून शेतात क्राँकीटकरण केले जात आहे. सुकूर पंचायतीच्या अखत्यारीतील राष्ट्रीय महामार्गालगत गिरीच्या शेतात मोठा सीवरेज ट्रीटमेंट प्लांट (एसटीपी) बांधण्याचे काम सुरू आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa News :

म्हापसा निसर्गाचे वरदान लाभलेले गाव म्हणून बार्देशमधील गिरी गावची ओळख होती. येथील राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याबाजूला असलेल्या खुल्या शेतजमिनीत निसर्गाच्या सान्निध्यात मोरांचे थवे पावसाळ्यात निर्भयपणे बागडताना दिसायचे.

मात्र, या शेतजमिनीत सुरू असलेल्या विकासकामांमुळे मोरांचे जीवन धोक्यात आले आहे. येथील जैवविविधता नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गिरी गावातून मोर हद्दपार होण्याची भीती व्यक्त होत असून संबंधित यंत्रणांनी यासंदर्भात दखल घेण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. त्याचप्रमाणे, मोरांचे जतन करण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी पक्षीप्रेमी व्यक्त करीत आहेत. गिरी येथील शेतजमिनीत काही महिन्यांपासून मलनिस्सारण प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहे.

या परिसरात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकून शेतात क्राँकीटकरण केले जात आहे. सुकूर पंचायतीच्या अखत्यारीतील राष्ट्रीय महामार्गालगत गिरीच्या शेतात मोठा सीवरेज ट्रीटमेंट प्लांट (एसटीपी) बांधण्याचे काम सुरू आहे. पर्यावरणाच्या किंमतीवर सध्या क्राँकीट संरचनेस सरकारकडून प्रोत्साहन दिले जात असल्याने स्थानिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

क्राँकीटची जंगले उभी; पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता

या क्षेत्रात पावसाळ्यात मोरांचे दर्शन होते. कित्येक वर्षांपासून लोकांना या मोरांचे दर्शन घडते. परंतु सद्यस्थितीत बांधकाम व विकासाच्या नावावरुन शेतजमिनीतील अतिक्रमणे पक्ष्यांच्या अधिवासावर संकट आलेले दिसते.

हीच परिस्थिती गोवा विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाहायला मिळते. तिथेही मोरांचे थवे दिसायचे. मात्र या परिसरात मोठ्या प्रमाणात क्राँकीटची जंगले उभी राहत असल्याने पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवासावर संक्रांत उभी राहिली आहे.

कारण, या भूमीवर जितका मनुष्य जातीचा अधिकार आहे, तितकाच समांतर हक्क प्राणी-पक्ष्यांचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT