Bodgeshwar Temple election Dainik Gomantak
गोवा

Bodgeshwar Temple: ‘बोडगेश्‍वर’ नवनिर्वाचित समितीचे भवितव्य न्यायालयाच्या हातात, 18 फेब्रुवारी रोजी सुनावणी

Bodgeshwar Temple New Committee: माजी अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी या निकालाला आव्हान दिले होते. त्यामुळे या समितीचे भवितव्य न्यायालयाच्या निर्णयावर ठरणार आहे.

Sameer Panditrao

पणजी: म्हापसा येथील श्री बोडगेश्‍वर देवस्थानचा निवडणूक निकाल तसेच नवनिर्वाचित व्यवस्थापकीय समितीच्या शपथविधीला अंतरिम स्थगिती देत स्‍थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश प्रशासकीय लवादाने देऊन त्यावरील सुनावणी १८ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे. माजी अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी या निकालाला आव्हान दिले होते. त्यामुळे या समितीचे भवितव्य न्यायालयाच्या निर्णयावर ठरणार आहे.

देवस्थानच्या निवडणुकीसाठी २५४ नवीन महाजनांना मतदानाचा अधिकार देण्याच्या मंदिर प्रशासकाच्‍या निर्णयाला अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते.

या देवस्थानची निवडणूक झाली असल्याने त्यात गोवा खंडपीठ हस्तक्षेप करू इच्छित नाही असे निरीक्षण नोंदवत निवडणूक प्रक्रिया तसेच मतदान यादीसंदर्भात याचिकादाराला गाऱ्हाणी मांडण्यासाठी कायद्यानुसार प्रशासकीय लवादाकडे तरतूद आहे. याचिकादाराने ती मागे घ्यावी, अन्यथा ती फेटाळण्यात येईल, असे खंडपीठाने गुरुवारी सकाळी सुनावणीवेळी स्पष्ट केले.

त्यामुळे याचिकादाराने ही याचिका मागे घेतली होती व त्याच दिवशी तातडीने प्रशासकीय न्यायालयात सादर करून दाद मागितली होती. त्यावर गेल्या गुरुवारी संध्याकाळी सुनावणी होऊन नवीन समितीचा शपथविधी १८ फेब्रुवारीपर्यंत केला जाऊ नये असे स्पष्ट करण्‍यात आले होते.

मंदिर प्रशासकाने श्री बोडगेश्‍‍वर देवस्थानच्या व्यवस्थापकीय समितीचा शपथविधी १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता निश्‍चित केला होता. मात्र, जर हा शपथविधी झाला तर आव्हान अर्ज कालबाह्य ठरू शकतो अशी बाजू भाईडकर यांच्या वकिलांनी मांडली. त्यामुळे हा शपथविधी पुढील सुनावणीनंतर घेण्यासाठी त्याला अंतरिम स्थगिती देण्यात येत असल्याचे न्यायालयाने दिलेल्या नऊ पानी आदेशात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT