Mapusa Theft Dainik Gomantak
गोवा

Mapusa Theft: म्हापशातील दरोडाप्रकरणी 3 जणांना अटक! पोलिसांचे पथक हैद्राबादमध्ये दाखल; संशयित बांगला देश, पश्चिम बंगाल, ओडिशामधील

Mapusa Ganeshpuri Theft: णेशपुरी-म्हापसा येथील डॉ. महेंद्र कामत घाणेकर यांच्या बंगल्यावर दरोडा घातल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या तिघांना हैदराबादमध्ये शिताफीने पकडण्यात गोवा पोलिसांना यश आले.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: गणेशपुरी-म्हापसा येथील डॉ. महेंद्र कामत घाणेकर यांच्या बंगल्यावर दरोडा घातल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या तिघांना हैदराबादमध्ये शिताफीने पकडण्यात गोवा पोलिसांना यश आले. गुरुवारी पोलिसांचे आणखी एक पथक हैदराबादमध्ये दाखल झाले आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली

सहाजणांच्या सशस्त्र टोळीने मंगळवारी घाणेकर कुटुंबीयांना बांधून ठेवून रोख व मौल्यवान वस्तू मिळून ३५ लाखांचा ऐवज लुटला होता. या दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी गोवा पोलिसांची आठ स्वतंत्र पथके शेजारील राज्यांमध्ये घटनेच्या दिवसांपासून तळ ठोकून आहेत. पोलिस उर्वरित दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

घटनेच्या दोन दिवसांनंतर पोलिसांच्या हाती तिघेजण लागले. वरिष्ठांचे मार्गदर्शन तपासकामात मोलाचे ठरले. मात्र, पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी यासंदर्भात माहिती देण्यास नकार दिला. संशयितांनी घाणेकर कुटुंबीयांना धाक दाखविण्यासाठी काही सुऱ्या व शस्त्रे सोबत आणली होती. त्यातील काही हत्यारे दरोडेखोरांनी घटनास्थळीच टाकून दिली होती. पोलिसांनी ही हत्यारे जप्त केली आहेत.

दोन टॅक्सींमधून गाठले बेळगाव

मंगळवारी पहाटे दरोडेखोरांनी पणजीत येलो-ब्लॅक टॅक्सी पकडली आणि ‘आम्हाला बेळगावमध्ये सोड’, असे चालकाला सांगितले. मात्र, गोव्याची सीमा ओलांडून जायचे असल्याने, चालकाने जुने गोवे-खोर्ली येथून दुसरी खासगी कार घेतली आणि संशयितांना बेळगावमध्ये सकाळी ८.३० वाजेपर्यंत सीबीटीजवळ सोडले.

त्यानंतर हा टॅक्सीचालक दुपारी १२च्या सुमारास पणजीत माघारी परतला. या दोन्ही वाहनांमध्ये संशयित बसल्याने या वाहनांची पोलिसांकडून फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली.

...असा केला पोबारा

१मंगळवारी पहाटे दरोडा टाकल्यानंतर हे दरोडेखोर पणजीहून खासगी टॅक्सीमधून बाणस्तारी, साखळी, चोर्ला मार्गे सकाळी ८.३० वाजता बेळगावमध्ये सीबीटी (बसस्थानकाजवळ) उतरले.

२ त्यानंतर या टोळीतील दरोडेखोर विखुरले आणि वेगवेगळ्या दिशेला गेले.

३मोबाईल लोकेशन आणि दरोडेखोरांच्या तयार केलेल्या रेखाचित्रांच्या मदतीने पोलिस या संशयितांचा माग काढत होते.

४अखेर यातील तीन संशयितांना पोलिसांनी हैदराबादमध्ये पकडून अटक केली.

संशयित बांगला देश, पश्चिम बंगाल, ओडिशामधील!

गणेशपुरी येथील डॉ. घाणेकर निवासस्थानी घातलेल्या धाडसी सशस्त्र दरोड्याच्या तपासाला आता निर्णायक वळण मिळाले आहे. विश्वसनीय सूत्रांनी माहितीनुसार, या घटनेनंतर तब्बल ३० तासांच्या चौकशीनंतर उघडकीस आले आहे की, संशयित टोळीला बंगळुरूमध्ये सोडण्यात आले होते.

त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही चित्रफितींच्या आधारे अनेक संशयितांची ओळख पटवली गेली. ते पुढे हैदराबाद येथे आश्रयास गेल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली. टोळीतील काही सदस्य हे बांगला देश, पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि तपासाला गती मिळाली.

एका संशयिताच्या मोबाईलवरील कॉल तपशील पोलिसांच्या हाती लागल्याने तपासात महत्त्वाचा धागा सापडला. या आधारे गुन्हे शाखेचे निरीक्षक तुषार लोटलीकर आणि विकास देईकर यांच्या नेतृत्वाखालील पथक संशयितांना पकडण्यासाठी रवाना झाले होते.

संशयित देशाची सीमारेषा ओलांडून बांगलादेशात पळ काढण्यापूर्वीच त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यात गोवा पोलिसांना यश आले आहे. या संशयितांकडून चोरलेले सोने किंवा रोख रक्कम सापडली का, याविषयी मात्र माहिती मिळू शकली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi Goa Speech: 'गोवा बनले भ्रष्टाचाराचे केंद्र', राहुल गांधींचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल; खाणकाम, जमीन आणि बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर

Mhadei River Dispute: म्हादईप्रश्नी राहुल गांधींचे मौन! गोव्याच्या हिताला डावलून कर्नाटकाची पाठराखण केल्याचा गोमंतकीयांचा आरोप; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

SCROLL FOR NEXT