Mapusa Rain Update  Dainik Gomantak
गोवा

Mapusa Rain Update : म्हापशात मान्सूनपूर्व कामांना गती; गटारांची साफसफाई जोरात

Mapusa Rain Update : पालिकेकडून मार्च-एप्रिलमध्ये गटार सफाई पालिकेमार्फत केली जात होती, परंतु आचारसंहितेमुळे व पालिकेच्या सुस्त कारभारामुळे ही कामे उशिराने सुरू झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Rain Update :

म्हापसा, मॉन्सून काही दिवसांवर येऊन ठेपल्याने म्हापसा पालिकेने मॉन्सूनपूर्व साफसफाईची कामे हाती घेतली आहेत. सध्या दोन प्रभागांतील कामे पूर्ण झाली असून मार्केट परिसरातील गटार उपसाच्या कामांना गती मिळाली आहे.

म्हापसा पालिकेकडून दरवर्षी मॉन्सूनपूर्व साफसफाईच्या माध्यमातून शहरातील सर्व गटारे साफ केली जातात. याशिवाय जलस्त्रोत खात्यातर्फे मुख्य नाल्यांचा गाळ उपसा केला जातो. शहरात जवळपास २० पेक्षा अधिक मुख्य नाले आहेत. हे नाले म्हापसा नदी व कुचेली सडयेहून शापोरा नदीला जोडतात.

पालिकेकडून मार्च-एप्रिलमध्ये गटार सफाई पालिकेमार्फत केली जात होती, परंतु आचारसंहितेमुळे व पालिकेच्या सुस्त कारभारामुळे ही कामे उशिराने सुरू झाली.

‘प्रमुख नाल्यांचीही साफसफाई लवकरच’

नगराध्यक्ष डॉ. नूतन बिचोलकर यांनी सांगितले की, आचार संहितेमुळे किंचित कामांना चालना देण्यास विलंब झाला असला तरी सध्या कामांना गती देण्यात आली आहे. दोन प्रभागांतील कामे पूर्ण झाली असून आता प्रभाग १५ मधील कामांना चालना दिली आहे.

ज्या प्रभागांमध्ये पाणी साचते किंवा पाण्याच्या निचऱ्यावर परिणाम होतो, अशा प्रभागांतील कामे आधी केली जातील. दोन कंत्राटदार नेमलेत. जलस्त्रोत खात्यातर्फे फक्त वर्क ऑर्डर येणे बाकी असून शहरातील प्रमुख नालेसफाई येत्या काही दिवसांत सुरू केले जाईल, असेही बिचोलकर यांनी स्पष्ट केले.

रात्रीच्यावेळी बाजारातील गटारांची साफसफाई

म्हापसा मार्केट परिसरात भूमिगत वीजवाहिन्यांचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. या कामावेळी मार्केटमधील रस्ते खोदले होते. मात्र, रस्ते पूर्ववत करताना येथील गटारांमध्ये मातीचे भराव टाकले. या प्रकारामुळे कंत्राटदाराला अतिरिक्त काम करावे लागत आहे.

सध्या रात्रीच्यावेळी बाजारातील गटारांची साफसफाई केली जात आहे. ऐरवी गटारांची साफसफाई करतेवेळी जात त्रास सहन करावा लागत नाही, परंतु गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात माती टाकल्याने काम वाढले आहे. प्रशासकीय विभागांतील समन्वयाच्या अभावामुळे हे प्रकार म्हापशात पाहायला मिळतात.

५२ लाखांची निविदा :

शहरातील प्रभाग १० व प्रभाग २ मधील गटारांच्या साफसफाईची कामे पूर्णत्वास आली आहेत, तर सध्या प्रभाग १५ मधील कामे हाती घेतली आहेत, अशी माहिती पालिकेतून मिळाली आहे. या कामासाठी पालिकेने दोन खासगी कंत्राटदार नेमले असून ५२ लाखांची निविदा काढली होती, तर मार्केट परिसरातील गटारांच्या साफसफाईसाठी एक समर्पित कंत्राटदार नेमला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT