Mapusa illegal construction Dainik Gomantak
गोवा

Mapusa: अखेर म्हापशातील ‘त्या’ बांधकामावर कारवाई, छतावरील पत्रे कोसळायचे बाजारपेठेत; पालिकेकडून दखल

Mapusa illegal construction: मरड येथील प्रेस्टिज आर्केड इमारतीच्या सहाव्या मजल्याचे बेकायदेशीर बांधकाम अखेर जमिनदोस्त करण्याचे काम म्हापसा पालिकेने हाती घेतले आहे.

Sameer Panditrao

म्हापसा: मरड येथील प्रेस्टिज आर्केड इमारतीच्या सहाव्या मजल्याचे बेकायदेशीर बांधकाम अखेर जमिनदोस्त करण्याचे काम म्हापसा पालिकेने हाती घेतले आहे. या छतावरील पत्रे वाऱ्याने उखडून म्हापसा बाजारपेठेत येऊन कोसळत असल्याने म्हापसा व्यापारी संघटनेने तक्रार केली होती. कारण पत्र्यांमुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.

बुधवारी सकाळी अतिक्रमण हटाव पथकाला पालिका अभियंता प्रशांत नार्वेकर, कनिष्ठ अभियंता सुभा आमोणकर, श्रृती हरमलकर, मंथन कासकर, पालिका निरीक्षक शेखर गावस, अजित होबळे, वामन पवार, आप्पालाल ताशेवाला, आरीफ मालदार व आनंद तलवार यांनी सहकार्य केले. तसेच संयुक्त मामलेदार साईश नाईक व पोलीस उपनिरीक्षक मंगेश पाळणी यांच्या नेृत्वाखालील पोलीस बंदोबस्त तैनात होता.

गेल्या गुरूवारी (ता.२२) रोजी प्रेस्टिज आर्केड इमारतीच्या छताचे काही पत्रे वाऱ्यामुळे उखडू लागले होते. म्हापसा व्यापारी संघटनेने हा प्रकार प्रसारमाध्यमांद्वारे पालिकेच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर लगेच पालिकेने इमारतीच्या मालकाला कारणे दाखवा नोटीस बजावत पत्र्यांसह छत पाडण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार संबंधित इमारत मालकाने छतावरील पत्रे काढले होते. मात्र छत पाडण्यास ते अपयशी ठरले होते. नंतर पालिका मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांनी हे बेकायदा छत तसेच स्लायडींग ग्लासचे बांधकाम २८ ते ३० मे अशा तीन दिवसांत जमिनदोस्त करण्याचा आदेश जारी केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

Goa Politics: म्हापशातील प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक; विकास ठप्प, सत्ताधाऱ्यांनी विकासाऐवजी केवळ घोषणाबाजी केल्याचा आरोप

Mangal Gochar 2026: लव्ह लाईफ होणार अधिक रोमँटिक, कुटुंबात राहणार आनंदाचे वातावरण; मंगळ देव 4 राशींना करणार मालामाल

Goa Monsoon Farming: डिचोलीत भाजी लागवडीची लगबग, पण मान्सून रुसल्याने बळीराजा चिंतेत; लागवडीची कामे खोळंबली

SCROLL FOR NEXT