Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: रवी शिरोडकर हल्ला प्रकरणात आणखी 5 जणांना अटक

आंबोली येथे लपलेले 5 संशयित ताब्यात

Sumit Tambekar

शिवोली: रवी शिरोडकर हल्लाप्रकरणी हणजुण पोलिसांनी आज आंबोली (महाराष्ट्र) येथे लपलेल्या आणखी पाच आरोपींना सापळा रचत अटक केली. त्यामूळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची संख्या दहावर गेली आहे.

म्हापसा पोलिसांनी पत्रकार परिषद घेत आज सविस्तर माहिती दिली. या प्रकरणात आतापर्यंत टार्जन पार्सेकर,(हडफडे), शैलेश चंदु नाईक, (कामुर्ली-बार्देश), सिद्धांत सुर्यकांत मांद्रेकर (गोलेतीवाडा-साळगाव), अमन रोहिदास शिरोडकर (निगवाडा-साळगाव), प्रशांत दासा राजू (परप्रांतीय, सध्या रा.नागवा), राजेश उर्फ वुडू केरकर (मरड-साळगाव) सागर पाटील,

साहिल पेडणेकर, सागर वावलापी (परप्रांतीय, सध्या रा.कांदोळी), श्रेणीत साखळकर (साळगाव) या संशयितांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यावेळी उप अधीक्षक जीवबा दळवी, पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई, उप निरीक्षक साहिल वरक उपस्थित होते.

मनोजच्या सांगण्यावरुनच हल्ला केल्याचा संशय

या हल्ल्यामागचा मुख्य सुत्रधार कुख्यात गुन्हेगार गजेंद्र सिंग उर्फ छोटु (सध्या तुरुंगात असलेला) याचा छोटा भाऊ मनोज सिंग याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे सध्या हणजुण पोलिस त्याच्या मागावर आहेत. हल्ल्याच्या वेळी मनोज सिंग संशयित टार्जन पार्सेकर यांच्या गाडीत होता. मनोजच्या सांगण्यावरुनच शिरोडकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला, असे अधीक्षक दळवी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चिमुरडीला कोणीतरी खेचत घेऊन चालला, तेव्हा आपलीच मंडळी त्याला हटकत नव्हती..! म्हापशातील दुर्घटनेने उघडे पाडले समाजाचे सुन्न वास्तव

गोव्यातही सरपंचांची थेट निवड व्हावी!

चिमुकलीवरील अत्याचारामुळे संतापाची लाट; टुगेदर फॉर म्हापसा संघटनेचे पालिकेला निवेदन, सुरक्षा उपायांच्या त्वरित अंमलबजावणी मागणी

Revolutionary Goans Party: 'आरजी' ये तेरा क्या हो गया?

VIDEO: 'मला विराट कोहलीसारखं खेळायचंय...' सेहवागच्या मुलाचे वक्तव्य चर्चेत; UAE विरुद्ध 160 धावांची खेळी करत दाखवला दम

SCROLL FOR NEXT