Theft Case Dainik Gomantak
गोवा

Mapusa: दुचाकी चोरी प्रकरणात मयडेतील दोघांना अटक

''राज्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या''

दैनिक गोमन्तक

गेल्या काही तासांत कोलवा पोलिसांनी गोगोल येथील गृहनिर्माण मंडळाच्या दोन रहिवाशांना कारमधून वस्तू चोरल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या दरम्यान आता म्हापसा पोलिसांनी एक कारवाई केली आहे. या कारवाईत दोघा चोरट्यांना अटक केली आहे. त्यामुळे राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढल्याची नागरीकांची शंका खरी ठरली आहे.

(Mapusa Police has arrested two people from Moira in two wheeler theft case )

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपुर्वी म्हापसा पोलिसांकडे दुचाकी चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली होती. यावरुन पोलिसांनी आज दोघांना अटक केली आहे. शंतनू चारी आणि शिवम मयेकर अशी या दोघांची नावे आहेत. दोघेही मयडे येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दुचाकी चोरीच्या संशयावरुन दोघांनाही ताब्यात घेत चौकशी केली असता संशयितांनी मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे. संशयितांकडून दुचाकी (RX-100) जप्त केली आहे. तसेच संशयितांचा आणखी कोणत्या गुन्ह्यात समावेश आहे का? याचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Taxi New Fare Rates: गोव्यात टॅक्सी प्रवासाचे नवे दर लवकरच लागू! पहिल्या 3 किमीला 300, 3 ते 8 किमीला 445 रुपये

Marathi Language Status: 'सहभाषेचा दर्जा, मग मराठीला न्याय कुठेय?' वेलिंगकरांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा; सावंतांची भूमिका दिशाभूल करणारी असल्याचा आरोप

Hamza Bin Laden: ओसामा बिन लादेनचा मुलगा 'हमजा' जिवंत? अल-कायदाच्या 50 मिनिटांच्या व्हिडिओनं खळबळ; जागतिक गुप्तचर संस्था सतर्क VIDEO

Goa Politics: 'मगो पक्षाने राजकीय मर्यादा ओळखाव्यात!' CM सावंतांचा मित्रपक्षाला सूचक टोला; मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यास स्पष्ट नकार

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्ग खुला; स्वातंत्र्यसैनिक दाद देसाई भारावले, दिगंबर कामतांसोबत केली पहिली सवारी

SCROLL FOR NEXT