Mapusa Police Arrested Three Accused In Minor Girl kidnapping Case Dainik Gomantak
गोवा

Mapusa: अल्पवयीन युवतीचे अपहरण केल्याप्रकरणी तिघांना अटक; म्हापसा पोलिसांची कारवाई

अल्पवयीन युवतीच्या वडिलांनी म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

Rajat Sawant

Mapusa Police Arrested Three Accused In Minor Girl kidnapping Case: सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीचे फूस लावून अपहरण केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे. संशयितांमध्ये एका परप्रांतिय युवकाचा समावेश आहे.

याबाबतची तक्रार गुरुवारी अल्पवयीन युवतीच्या वडिलांनी म्हापसा पोलिसांत दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या 6 तासांत अल्पवयीन मुलीचा शोध घेत पोलिसांनी 3 संशयितांना अटक केली.

एसडीपीओ म्हापसा जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 वर्षांची अल्पवयीन मुलगी राहत्या घरातून बेपत्ता असल्याची तक्रार अल्पवयीन युवतीच्या वडिलांनी म्हापसा पोलिसांत 12 ऑक्टोंबरला दाखल केली होती. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला.

एसडीपीओ जिवबा दळवी आणि पीआय सीताकांत नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गौरव नाईक, पीएसआय दिनेशकुमार मुखिया, पीएसआय विराज कोरागावकर, एलपीएसआय ऋचा भोसले, हेड कॉन्स्टेबल सुशांत चोपडेकर, पोलीस कॉंन्स्टेबल प्रकाश पोळेकर, राजेश पाटील, राजेश कांदोळकर यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करण्यात आली.

एलपीसी रंजना परब यांनी संबंधित आरोपींबाबत गुप्त माहिती गोळा करण्यासाठी आणि तक्रारदाराच्या घरापासून जवळच्या जंक्शनवरील सीसीटीव्ही फुटेज गोळा केले.

अधिक तपासात अल्पवयीन मुलगी अस्नोडा येथील एका घरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने रात्रीच्या वेळी घरावर छापा टाकून पीडित मुलीची सुटका केली आणि 3 संशयित आरोपींना अटक केली. अॅरॉन पर्सी मोनिझ रा. अस्नोडा, आयुष मांद्रेकर, रा. शिरसई, बादल सिंग रा. कोलवाळ अशी संशयितांची नावे आहेत.

तपासात समोर आले की, पीडित तरुणी इंस्टाग्रामच्या माध्यमातून संशयित बादलच्या संपर्कात आली होती. बादल अल्पवयीन मुलीच्या घरी गेला होता आणि त्याने अल्पवयीन मुलीला सोबत नेले आणि त्याच्यासोबत राहायला लावले.

संशयिताने पुढे त्याचा मित्र संशयित आयुष आणि अॅरॉन यांच्याशी संपर्क साधला आणि अल्पवयीन मुलीला अस्नोडा येथे अॅरॉनच्या घरी नेले. तपासात संशयितांनी या गुन्ह्यात आपला सहभाग असल्याची कबुली दिली.

संशयितांना म्हापसा न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पीआय सीताकांत नायक, एसडीपीओ म्हापसा जिवबा दळवी आणि उत्तर गोव्याचे एसपी निधिन वाल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

अशाच प्रकारची अपहरणाची तक्रार काही दिवसांपूर्वी म्हापसा पोलिसांत दाखल करण्यात आली होती. यासाठी पोलिसांनी तीन पथके स्थापन करुन शोधमोहीम राबवली होती. मात्र संबंधित मुलगी शाळेतील अभ्यास पूर्ण न झाल्याने शाळा बंक करण्यासाठी ती म्हापसा बस स्टॅन्डवर बसल्याची आढळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT