Mapusa  Dainik Gomantak
गोवा

Mapusa News : पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवड आवश्यक : स्वप्नीता नागवेकर

Mapusa News : गोमन्तकतर्फे खोर्ली, म्हापसा येथील सारस्वत विद्यालयात वृक्षारोपण

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa News :

म्हापसा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बुधवारी (ता.५) खोर्ली, म्हापसा येथील सारस्वत विद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. या पार्श्वभूमीवर, आयुर्वेदिक रोपे व विविध रंगीबेरंगी फुले-फळे आणि शोभिवंत झाडांची लागवड शाळा आवारात करण्यात आली.

यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वप्नीता नागवेकर, शिक्षकवर्ग तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गोमन्तक हा विशेष कार्यक्रम आयोजित करतो. वृक्षांचे संवर्धन ही काळाची गरज असून त्या दृष्टीने दरवर्षी पावसाळ्यात गोमन्तक शाळांमध्ये अशाप्रकारे वृक्षारोपण मोहिमेला प्रोत्साहन देते.

यावेळी मुख्याध्यापिका स्वप्नीता नागवेकर यांनी सांगितले की, वैश्विक तापमानातील वाढ व हवामानातील बदल यांची तीव्रता तसेच परिणामकारकता कमी करणे, पर्यावरणाचा समतोल, संतुलन, संवर्धन व सुरक्षा राखणे यासाठी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम गरजेचा असतो. गोमन्तकने अशाप्रकारे मोहीम राबवून स्तुत्य कार्य हाती घेतले आहे.

वाढदिवसाला झाड लावा

विद्यार्थ्यांमध्ये जैवविविधता, वनसंपदा त्यांचे संरक्षण व जतन याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये व्हावी यासाठी असे कार्यक्रम उपयोगी ठरतात. विद्यार्थ्यांनी झाडांचे महत्त्व समजून घ्यावे. पर्यावरण रक्षणासाठी झाडे महत्त्वाची आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या वाढदिवस साजरा करताना एखादे झाड लावून ते जगवावे, असे आवाहन मुख्याध्यापिका नागवेकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

WWE सुपरस्टारची गोळ्या घालून निर्घृण हत्या, 18 वर्षांची कारकीर्द एका क्षणात संपली

Wild Vegetables: पावसाळ्यातील किमया! गोव्यातील चविष्ट रानभाज्या..

'कोणतरी मरत नाही तोपर्यंत सरकार लक्ष देणार नाही'; मनसे नेत्याने शेअर केला कशेडी बोगद्याचा धक्कादायक व्हिडिओ

Shravan 2025: 'श्रावण सोमवार' व्रत करणार असाल तर 'हे' नक्की वाचा! काय करावं, काय टाळावं? पूजेचे संपूर्ण नियम

SCROLL FOR NEXT