Mapusa Municipality Dainik Gomantak
गोवा

Mapusa Municipality: म्हापसा नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित कारण...

सत्ताधारी गटाकडून एकमेव अर्ज आल्याने प्रिया मिशाळ यांची म्हापसा नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे.

दैनिक गोमन्तक

Mapusa Municipality: म्हापसा येथील नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी काल नगरसेविका प्रिया मिशाळ यांचा एकमेव अर्ज आला असून मंगळवारी या पदासाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान, सत्ताधारी गटाकडून एकमेव अर्ज आल्याने प्रिया मिशाळ यांची म्हापसा नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे.

सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत म्हापसा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ होती. त्यानुसार, सत्ताधारी गटातर्फे प्रिया मिशाळ यांनी मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला.

नगरसेवक प्रकाश भिवशेट यांची या उमेदवारी अर्जावर प्रस्ताव तर नगरसेविका डॉ. नूतन बिचोलकर यांची अनुमोदक म्हणून स्वाक्षरी आहे.

अर्ज भरतेवेळी नगरसेविका प्रिया मिशाळ यांच्यासोबत प्रभारी नगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर यांच्यासह सत्ताधारी गटातील अधिकतर नगरसेवक हे पालिकेत हजर होते. मात्र, सत्ताधारी गटातील शुभांगी वायंगणकर या गैरहजर होत्या.

शुभांगी वायंगणकर यांनी 11 जानेवारीला नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महिलांसाठी आरक्षित असलेले हे नगराध्यक्षपद सध्या रिक्त आहे.

सत्ताधारी गटाकडे 14 नगरसेवक

सध्या प्रभारी नगराध्यक्ष म्हणून उपनगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर हे पदभार सांभाळत आहेत. सत्ताधारी गटाकडे वीस नगरसेवकांपैकी 14 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. तर विरोधी गटाकडे संख्याबळ नसल्याने संबंधितांकडून अर्ज दाखल करण्यात आला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

National Education Policy Goa: पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 10 वी अन् 11वीतही 'NEP' लागू होणार! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Goa Assembly Three Day Session: सहा महिन्यांचा हिशेब ३ दिवसांत! विरोधी पक्षनेत्यांची टीका, 31ऑगस्‍ट ते 2 सप्‍टेंबर अल्प कालावधीचे अधिवेशन

Student Protest Firing Allegations: 'गृहमंत्र्यांनीच दिला आंदोलकांवर गोळीबाराचा आदेश!' लोकसभेत परीक्षा दुरुस्ती विधेयक मंजूर, विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपाने संसदेत गदारोळ

Goa liquor Smuggling In Telangana: गोवा-तेलंगणा हवाई मद्यतस्करीचा पर्दाफाश; 98 महागड्या बाटल्या जप्त, 2 जण ताब्यात, तपास सुरू

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

SCROLL FOR NEXT