Mapusa  Gomantak Digital Team
गोवा

Mapusa News : म्हापसा पालिकेचे अतिक्रमण हटाव

उद्याही कडक कारवाई : पहिल्याच दिवशी पाच ट्रक माल जप्त

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa News : येथील मार्केट परिसर तसेच पालिका कार्यक्षेत्रात अनेक अनधिकृत विक्रेत्यांनी जागा अडवून आपले बस्तान मांडले आहे. या गैरप्रकारामुळे पादचाऱ्यांना चालण्यास पुरेशी वाट नसते. तसेच बऱ्याचदा वाहतुकीवर परिणाम होत असतो.

त्यानुसार, म्हापसा पालिकेने बुधवारी (ता.१०) अतिक्रमण हटाव मोहीम राबवत शहरातील अशा बेकायदा अतिक्रमणांवर कारवाई करीत पहिल्याच दिवशी जवळपास पाच ट्रक माल जप्त केला. उद्या गुरुवारी ही कारवाई चालूच राहणार आहे. यासंदर्भात म्हापसा पालिकेचे मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, रस्त्याशेजारी अनेक फळ तसेच इतर विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते.

याची दखल घेत मध्यंतरी म्हापसा पालिका क्षेत्रात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाईल, अशी सार्वजनिक नोटीस जारी केली होती. या नोटिशीनुसार संबंधितांना अतिक्रमण हटविण्यासाठी पुरेसा वेळ दिलेला होती. सकाळपासून पालिका कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध भागांत अतिक्रमण हटाव मोहीम राबवत जवळपास पाच ट्रक साहित्य जप्त केले. यामध्ये फळ विक्रेत्यांपासून अनधिकृत सूचना फलक तसेच काहींना फुटपाथ तसेच दुकानांसमोर साहित्य मांडून रस्ता अडविल्याने त्यांचाही माल जप्त करण्यात आला.

उद्या गुरुवारी ही मोहीम चालूच राहिल, अशी माहिती मुख्याधिकाऱ्यांनी यावेळी दिली. दोन पथकांची नियुक्त करीत प्रत्येक पथकात एक पालिका निरीक्षक व दहा कर्मचारी नेमलेले. त्यानुसार ही कारवाई बोडगिणी परिसर, गणेशपुरी, हाउसिंग बोर्ड, कोर्ट जंक्शन, जुनी पालिका इमारत या भागांत राबविण्यात आली होती. दरम्यान, बुधवारी रात्री रस्त्यांवर फास्टफूड विक्री करणाऱ्या गाडेधारकांवरही कारवाई करण्यात आली.

पदपथ मोकळे होणार

म्हापसा पालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी मोक्याच्या ठिकाणी, पदपथावर बऱ्याच विक्रेत्यांनी अतिक्रमण केले असून जागा अडविलेली आहे. त्याम्ुळे पादचाऱ्यांना ये-जा करणे अवघड होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना तर या ठिकाणाहून जाणे कठिण होत आहे.

त्यामुळे हे अतिक्रमण हटविण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. पालिकेने धडक मोहिमेद्वारे अतिक्रमणे हटविणे सुरू केल्याने पदपथ मोकळे होणार आहेत, त्याबाबत ज्येष्ठ नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

SCROLL FOR NEXT