Mapusa Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Mapusa Municipal Council: वादग्रस्त शेड उभारणीस म्हापसा पालिकेने दिला हिरवा कंदील!

Controversial Shed Construction Case: पीडीएमधून सनद सादर केल्याने पालिकेने अर्जदारास बांधकाम परवाना केला मंजूर

गोमन्तक डिजिटल टीम

दत्तवाडी, म्हापसा येथील स्मशानभूमी शेजारील खुल्या कोमुनिदाद जागेत वर्कशॉप उभारण्यासाठी पोलादी शेडचे बांधकाम सुरू केल्याने शहरात खळबळ माजली होती. या वादग्रस्त बांधकामास अनेक समाज कार्यकर्त्यांनी एकत्रित येत जोरदार हरकत घेतली असताना, यात नवीन अद्यतन (अपडेट) असे की म्हापसा पालिकेने या शेड उभारणीला बांधकाम परवाना मंजूर केला.

पालिका सूत्रांनी सांगितले की, म्हापसा ग्रामस्थ हिंदू सभाने म्हापसा पालिकेकजवळ या जागेत बांधकाम उभारणीसाठी परवानगी मागितली होती. संबंधितांनी पालिकेला आवश्यक परवान्यांची प्रत उपलब्ध करुन अर्ज केला होता. पीडीएमधून सनद सादर केल्याने पालिकेने वरील अर्जदारास बांधकाम परवाना मंजूर केला.

म्हापसा ग्रामस्थ हिंदू सभाने म्हापसा पालिकेजवळ २.५लाख रुपये दंडसह एकूण १७ लाख रुपये शुल्क भरले. पालिकेच्या पूर्वपरवानगी शिवाय या शेड उभारणीचे काम चालू केल्यानेच हा अडीज लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, स्मशानभूमीलगत असलेली ही खुली जागा एका मोटरवाहन कंपनीजवळ करार करून भाडेपट्टीवर दिल्याचे समजते. या कंपनीत एका सत्ताधारी प्रमुख नेत्याची हिस्सेदारी आहे, अशी माहिती समोर येत आहे.

कोमुनिदाद जागेत अशाप्रकारे व्यावसायिक आस्थापन उभे राहत असल्याने, शहरातील काही लोकांनी तसेच समाजकार्यकत्याने या प्रकाराला तीव्र विरोध दर्शविला होता. तसेच संबंधितांवर कारवाई करीत ही जागा पूर्ववत करण्याची मागणी केली होती. मात्र आता पालिकेने बांधकाम परवाना मंजूर करीत, शेडच्या बांधकामाला हिरवा कंदिल दिल्याने या प्रकाराला वेगळी कलाटणी मिळाली आहे.

प्राधिकरणांकडून मान्यता

म्हापसा ग्रामस्थ हिंदू सभेतर्फे म्हापसा पालिकेकडे बांधकाम परवान्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार पालिकेने संबंधितांना गेल्या शुक्रवारी परवानगी मंजूर केली. या जागेत म्हापसा पालिकेची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय शेड उभारणीच्या कामास चालना दिली. परिणामी, पालिकेत लेखी तक्रार दाखल होताच, पालिकेने ते काम थांबविण्याची नोटीस जारी केली होती. कालांतराने म्हापसा पालिकेजवळ प्रतिवादीकडून अर्ज दाखल होताच, तसेच त्यांनी पालिकेला संबंधित प्राधिकरणांकडून मिळवलेले परवाने उपलब्ध केल्यामुळे या शेडच्या बांधकामास परवानगी दिल्याचे समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

6.30 कोटींची फसवणूक; संशयित दोडामार्गात जेरबंद, बंगळुरू पोलिसांच्या तावडीतून झालेला फरार; इको-फार्ममधून ताब्यात

Viral Video Controversy: पर्यटकाच्या इन्स्टाग्राम रीलमुळे वाद, टॅक्सी चालकांची एन्फ्लुएन्सरविरोधात पोलिसांत तक्रार

Cashew Festival 2026: गोवा काजू महोत्सवाची पर्वणी, पणजीत आयोजन; गोव्याच्या कृषी वारशाचा दिमाखदार उत्सव

Goa Crime: टँकर चालकावर जुन्या मालकाकडून खुनी हल्ला! पणजीतील प्रकार; संशयित समीर खानला अटक

छत्तीसगडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! दोन कारची समोरासमोर धडक; एका लहान मुलासह 6 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT