Mapusa News : म्हापसा, रामतळे व साईनगरमधील रहिवाशांनी मंदिर जवळील प्रस्तावित ‘मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी’ सुविधेला विरोध करण्याच्या त्यांच्या निर्णयावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. हळदोणा येथे रविवारी झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत एमआरएफ शेडशी संबंधित समस्यांवर चर्चा करण्यात आली. याशिवाय रामतळे येथील घरांना नोटीस बजावण्याच्या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली.
तसेच, स्थानिक रहिवाशांनी कारवाईला घाबरु नये, कारण आम्ही आमचे मंदिर व आमची घरे वाचवण्यासाठी संघर्ष करण्यास तयार आहोत, असे यावेळी ठरविण्यात आले. गावकऱ्यांनी सांगितले की, काही निवडक स्थानिकांवर घरांसदर्भात त्यांनी बेकायदेशीर बांधकाम केल्याबद्दल तक्रारी केल्या आहेत.
अमर मांद्रेकर यांनी सांगितले की, माजी मुख्यमंत्र्यांनी २००० पूर्वी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी पुढाकार घेतला होता. नुकतीच बांधलेली घरे पाडली जातील. कोमुनिदादच्या मालमत्तेवर अतिक्रमण करू नका, कारण ती गावकरांची जमीन आहे.
आणि त्यांनी आम्हाला मंदिरासाठी जमीन दिली आहे. तसेच, मांद्रेकर यांनी उपस्थित रहिवाशांना आश्वासन दिले की ते घरांच्या संरक्षणासाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत जातील व सर्व पर्यायचा अवलंब करतील. यावेळी समीर गडेकर व स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हळदोणे पंचायत मंडळाने नाताळच्या सुट्टीच्या दिवशी ‘एमआरएफ’ शेड उभारण्याचा प्रयत्न केला. आम्ही आमची घरे वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करू. याप्रश्नी हळदोणेच्या आमदारांनी ग्रामस्थांना पाठिंबा द्यावा.
अमर मांद्रेकर,
रामतळे रहिवाशी
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.