Mapusa Market Dainik Gomantak
गोवा

Mapusa Market : म्हापशातील व्यापारीवर्ग संतप्‍त; उतरला रस्‍त्‍यावर

नोटिशीला आक्षेप : अध्यादेशाची मागणी

दैनिक गोमन्तक डिजिटल

Mapusa Market : येथील भाडेपट्टीवरील दुकाने व स्टॉल्सच्या 309 भाडेकरूंना पालिकेने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. त्‍याच्‍या निषेधार्थ मंगळवारी मार्केटमधील सर्व दुकाने बंद ठेवून व्यापारी रस्त्यावर उतरले.

दुकानदारांच्या हितार्थ त्वरित अध्यादेश काढून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करत व्यापाऱ्यांनी उपसभापती तथा स्थानिक आमदार जोशुआ डिसोझा यांची निवासस्थानी भेट घेत त्यांना निवेदन दिले.

सुमारे अडीशेपेक्षा अधिक व्यापारी दत्तवाडी येथील जोशुआंच्या घराबाहेर जमले होते. दुपारपर्यंत व्यापाऱ्यांनी आपली आस्थापने बंद ठेवली. त्यामुळे मार्केटमध्ये शुकशुकाट होता.

यावेळी म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद सावंत, उपाध्यक्ष आसिस कार्दोज, सचिव सिद्धेश राऊत, खजिनदार जितेंद्र फळारी, पांडुरंग सावंत, आशिष शिरोडकर, रूपेश शिंदे या शिष्टमंडळाने उपसभापतींची भेट घेतली.

प्रकरण काय?

भाडेकरू करारपत्र नूतनीकरणाच्या पार्श्वभूमीवर मार्केटमधील काही दुकानदारांनी दुकाने परस्पर तिसऱ्या व्यक्तीस भाडेपट्टीने दिल्याबद्दल संबंधित दुकान व स्टॉल्सच्या मूळ ३०९ भाडेकरूंना सध्या कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Bomb Blast: 'पहिला स्फोट झाला अन् मदत करायला गेले...', पाकिस्तानात बॅक-टू-बॅक धमाके, 7 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

Goa Coal Mining: "गोव्यातून कोळसा हद्दपार करा!", गोवा फॉरवर्डने फुंकले आंदोलनाचे रणशिंग; सरकारला दिला थेट इशारा

Bangladesh Hindu Protest: "प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेवर बूट ठेवून केली विटंबना..."; इस्लामिक कट्टरपंथियांविरोधात बांगलादेशात हिंदूंचा महाआक्रोश VIDEO

India Population: लोकसंख्या का वाढवता?

Sanjivani Sugar Factory: संजीवनी साखर कारखान्याचे कर्मचारी वेतनाविना; वित्त खात्यात फाईल प्रलंबित, 2 महिन्यांचे वेतन अडल्याने कोंडी

SCROLL FOR NEXT