mapusa Market Dainik Gomantak
गोवा

Mapusa Market: म्हापसा मार्केट समस्यांच्या गर्तेत

आश्वासने नकोत; अंमलबजावणी हवी: व्यापाऱ्यांनी पालिकेला खडसावले

दैनिक गोमन्तक

Mapusa Market: ढेपाळलेल्या नगरपालिका प्रशासनामुळे म्हापसा मार्केटमधील अनियंत्रित विक्रेत्यांची संख्या, बंद असलेली शौचालये, पार्किंगचा मुद्दा, पथदीप व आपत्कालिन सेवेच्या वाहनांना बाजारपेठेत जाण्यास नसलेली वाट, यामुळे व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला. गेली वीस वर्षे ही स्थिती ‘जैसे थे’ आहे. थोडे दिवस पालिका सक्रिय होते व नंतर ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या’, असे म्हणत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांना खडे बोल सुनावले.

यासंदर्भात मंगळवारी (ता.२२) म्हापसा व्यापारी संघटनेने नगराध्यक्षांना मागण्यांचे निवेदन दिले.यावेळी अध्यक्ष श्रीपाद सावंत, सचिव सिद्धेश राऊत, सहखजिनदार पांडुरंग सावंत, खजिनदार जितेंद्र फळारी, सदस्य गीतेश डांगी, सदस्य वल्लभ मिशाळ हे उपस्थित होते. मार्केटमधील स्थिती बिकट होत असून, यावेळी व्यापऱ्यांनी नगराध्यक्षांपुढे पेठेतील समस्यांचा पाढाच वाचला. आश्वासने नकोत, कृती हवी, असेही व्यापाऱ्यांनी केली आहे.

मार्केटमधील समस्यांचे निवारणासाठी पालिका कटिबद्ध आहे. फळ विक्रेते बसतात त्या लेनमध्ये आपत्कालिन सेवांच्या वाहनांना जाता यावे यासाठी ४.६० मीटर जागा सोडली आहे.

तसेच विक्रेत्यांना पुन्हा जागेचे चिन्हांकन केले आहे. रविवारच्या मार्केटमधील घटनेनंतर पुन्हा एकदा आम्ही संयुक्त पाहणी करणार आहोत.

- प्रिया मिशाळ, म्हापसा नगराध्यक्षा

...तर व्यापारी आक्रमक होतील !

पांडुरंग सावंत म्हणाले, व्यापारी संघनटेकडून पालिकेला यापूर्वी अनेक निवेदने दिली आहेत. मात्र, अंमलबजावणी होत नाही. आतापर्यंत अनेक मुख्याधिकारी व नगराध्यक्ष बदलले, परंतु मार्केटमधील समस्या ‘जैसे थे’. अनियंत्रित विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. या विक्रेत्यांकडे ओळखपत्रे नसतात. अतिक्रमण करणाऱ्यांवर पालिका कारवाई करण्यास मागेपुढे पाहते. ही स्थिती वेळीच न सुधारल्यास व्यापारी आक्रमक होतील, असा इशारा त्यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT