Goa Crime News | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: अमली पदार्थ विक्रीचा डाव फसला; 20 लाखांच्या कोकेनसह युगांडाच्या दोघांना म्हापशात अटक

Goa Drug Case: म्हापसा नवीन केटीसी बसस्थानकावर पोलिसांनी ही कारवाई केली.

Pramod Yadav

म्हापसा: पेडण्यात अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एका रशियन नागरिकाला अटक करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हापशात अमली पदार्थ विक्री प्रकरणी युगांडाच्या दोघांना अटक करण्यात आली आहे. म्हापसा पोलिसांनी नवे केटीसी बसस्थानक येथे ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युगांडाचे दोन नागरिक नव्या केटीसी बसस्थानकाजवळ कोकेन या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आले होते. म्हापसा पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी बस स्थानकावरुन दोघांना ताब्यात घेतले.

चौकशीअंती त्यांच्याकडे २० लाख ५० हजार किमतीचा २०५ ग्रॅम वजनाचा कोकेन हा अमली पदार्थ आढळून आला आहे. पोलिसांनी संशयित दोघांना अटक केली असून, अधिक तपास सुरु आहे.

पेडण्यात रशियन नागरिकाला अटक

पेडण्यात अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत दीड लाखांच्या गांजासह रशियन नागरिकाला शुक्रवारी (दि.१६) अटक करण्यात आली. कॉनस्टेनटाईन मार्झली या रशियन नागरिकाला १.६६ लाखांच्या गांजासह अटक करण्यात आली.

मांद्रेतील माराठावाडा येथील सातेरी मंदिराजवळ हा रशियन नागरिक तस्करीसाठी आला असता अमली विरोधी पथकाने कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

SCROLL FOR NEXT