Mapusa Theft Dainik Gomantak
गोवा

Mapusa Theft: म्हापसा दरोडा! दरोडेखोरांची टोळी 4 राज्ये ओलांडून बांगलादेशात? पोलिसांचे प्रयत्न तोडके

Ganeshpuri Mapusa Theft: अट्टल दरोडेखोरांनी केलेल्या फुलप्रुफ प्लॅनसमोर गोवा पोलिसांचे सर्वच प्रयत्न तोडके पडल्याचे दिसून येत आहे. काही तपास पथके गोव्यात माघारी परतली आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: गणेशपुरी येथे डॉ. घाणेकर यांच्या बंगल्यावर ७ ऑक्टोबरला दरोडेखोरांनी घरातून ३५ लाखांचा किंमतीचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणातील दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी गोवा पोलिसांनी विविध पथके स्थापित ती शेजारील राज्यांत पाठवली.

मात्र, अट्टल दरोडेखोरांनी केलेल्या फुलप्रुफ प्लॅनसमोर गोवा पोलिसांचे सर्वच प्रयत्न तोडके पडल्याचे दिसून येत आहे. काही तपास पथके गोव्यात माघारी परतली आहेत.

गोवा पोलिस यंत्रणेला कोणताही सुगावा लागण्यापूर्वी व पोलिसांच्या आवश्यक हालचालीपूर्वीच या दरोडेखोरांनी आधी गोव्याची नंतर कर्नाटक, तेलांगण व मेघालय अशा चार प्रमुख राज्यांची सीमा ओलांडीत, बांगलादेशपर्यंत पसार झाल्याची शक्यता वर्तवण्यात ये आहे.

त्यामुळे पोलिसांच्या तपास यंत्रणांची ‘पोलादी चौकट’ भेदून या अट्टल दरोडेखोरांनी या दरोड्यात किती बारकाईने रेकी करत दरोडा घातला, हेच आता अधोरेखित होते.

संशयितांबाबतही संशय...

गोवा पोलिसांच्या तपास पथकांनी चार ते पाच जणांना ताब्यात घेतले होते. याच संशयितांनी पळून गेलेल्या दरोडेखोरांना रसद पुरवठा केल्याचे चौकशीत निश्चित झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले होते. अजूनही या संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. परंतु अद्याप पोलिसांच्या हाती काहीच ठोस लागलेले नाही, असे सूत्रांनी सांगितले.

चार राज्ये ओलांडून दरोडेखोर बांगलादेशात!

गणेशपुरी येथे डॉ. घाणेकर यांच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा टाकून पसार झालेली बांगलादेशी टोळी देशाची सीमा ओलांडून बांगलादेशात पसार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. क्राईम ब्रँचची मोजकी पथकेच सध्या शेजारील राज्यांत या दरोडेखोरांचा काही तरी सुगावा हाती मिळावा या आशेपोटी तळ ठोकून आहेत.

तर उर्वरित पोलिस स्थानकांची पथके गोव्यात माघारी परतली आहेत. गोवा, कर्नाटक, तेलंगणा व मेघालय अशी चार प्रमुख राज्यांची सीमा ओलांडून व पोलिस यंत्रणांना गुंगारा व चकमा देत बांगलादेशी दरोडेखोरांची टोळी बांगलादेशात पोहचल्याने आता या चोरट्यांना पकडून भारतात आणण्याचे मोठे आव्हान गोवा पोलिसांसमोर आहे, जी आशा सध्यातरी धूसर दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT