Cyber Crime Dainik Gomantak
गोवा

Cyber Crime: म्हापशातील नागरिकाला 1.2 लाखांचा गंडा; अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरू

Mapusa Cyber Fraud: ऑनलाइन फसवणुकीत म्हापशातील ४७ वर्षीय केव्हिन सिमोईस यांना १ लाख २ हजार १७८ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा, ता. १३ (प्रतिनिधी): ऑनलाइन फसवणुकीत म्हापशातील ४७ वर्षीय केव्हिन सिमोईस यांना १ लाख २ हजार १७८ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला.

फेर-आल्त- म्हापसा येथील अल्कॉन कॉलनीत राहणाऱ्या सिमॉईस यांच्याशी ७ ऑगस्ट रोजी सकाळी अज्ञात व्यक्तीने संपर्क साधला. फसवणुकीच्या उद्देशाने संवाद साधून त्यांच्या बँक खात्यातून १,०२,१७८ रुपये बेकायदेशीरपणे काढून घेण्यात आले.

याप्रकरणी सायबर गुन्हे पोलिस ठाण्याकडून प्राप्त ‘एफआयआर’च्या आधारे म्हापसा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३१८ अंतर्गत अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक अजय धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

SCROLL FOR NEXT