Mapusa Roads  Dainik Gomantak
गोवा

Cuchelim Road Issue: खड्ड्यांमुळे वाढले अपघात; कुचेली- करासवाडा येथील नागरिक त्रस्त

Mapusa Road: सार्वजनिक बांधकाम खात्याचे या समस्येकडे दुर्लक्ष झाले असल्याची नाराजी

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा पालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १ मधील कुचेली ते करासवाडा मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहते. वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने छोटे-मोठे अपघात होत आहेत.

म्हापसा मतदारसंघाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी हा मार्ग सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दुरुस्त करून घ्यावा, अशी मागणी नगरसेवक आनंद भाईडकर यांनी केली आहे.

कुचेली ते करासवाडा हा रस्ता सुमारे दीड किलोमीटर लांबीचा आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहते. अनेक दुचाकीचालक या खड्ड्यांमध्ये पडून जायबंदी झाले आहेत. त्यांच्या वाहनांचीही मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली आहे. संबंधित नगरसेवक किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याचे या समस्येकडे दुर्लक्ष झाले असल्याची नाराजी रहिवासी संतोष रायकर यांनी व्यक्त केली.

नगरसेवक आनंद भाईडकर म्हणाले की, सध्या या मार्गावरून मोपा विमानतळावर ये-जा करणारी वाहने, रेती, चिरेवाहू व इतर अवजड वाहनेही याच मार्गावरून जाण्यासाठी कोलवाळ सेंटर जेलजवळील पुलाखालून येतात. त्यामुळे तेथून येणाऱ्या वाहनांना या मार्गावर बंदी घालावी.

पेव्हर्स बसवून दुरुस्ती करणार

सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते महेश शेट्टी म्हणाले की, सध्या पाऊस पडत आहे. त्यामुळे खड्ड्यांचे डांबरीकरण करणे शक्य नाही. पुढील आठवड्यापासून आम्ही या ठिकाणी पेव्हर्स टाकून तात्पुरती डागडुजी करणार आहोत. पावसाळा झाल्यावर डांबरीकरण करण्यात येईल. रस्त्यावर पाणी साठण्याचे कारण म्हणजे, या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारांची व्यवस्था केलेली नाही, तीही करणे गरजेचे असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

‘साबांखा’ची कामे आम्हीच करतो!

नगरसेवक आनंद भाईडकर म्हणाले की, मी दरवर्षी माझ्या परीने हे खड्डे बुजविण्याचे काम करतो. परंतु या प्रभागातील रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिपत्याखाली येतो. तो दुरुस्त करण्यासाठी स्थानिक आमदारांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला कळविणे गरजेचे आहे; परंतु आमदार याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना त्रास होतो. आम्हीच जर ‘साबांखा’ची कामे करू लागलो तर आमदार कोणते काम करणार, असाही प्रश्न नगरसेवक भाईडकर यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

SCROLL FOR NEXT