Mapusa Crime News 
गोवा

Mapusa Crime News: म्हापशात अल्पवयीन मुलांना भीक मागायला लावणाऱ्या संशयितावर गुन्हा दाखल

म्हापसा पोलिसांकडून एकावर गुन्हा नोंद

दैनिक गोमन्तक

Mapusa Crime News: आपल्या अल्पवयीन मुलांना जबरदस्तीने भीक मागायला लावणे तसेच यातून मुलांची सुटका करणार्‍या फिर्यादीस शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी मूळ सोलापूर-महाराष्ट्रातील संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला. गोपिनाथ बापू काळे (रा. म्हापसा) असे संशयिताचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना दि. 29 रोजी सायंकाळी 8.30च्या सुमारास म्हापसा केटीसी बसस्थानकावर घडली. संशयित आरोपीने आपल्या दोन अल्पवयीन मुलांना जबरदस्तीने भीक मागायला लावले होते. हा प्रकार लक्षात येताच, चाईल्ड लाईनच्या सदस्या असलेल्या फिर्यादी मायरा फर्नांडिस (20, म्हापसा) यांनी याप्रकाराला आक्षेप घेत, वरील दोन्ही मुलांचे रेस्क्यू केले. त्यामुळे संशयिताने फिर्यादीस शिवीगाळ करीत त्यांना मारहाण केली. यात फिर्यादीस दुखापत झाली.

याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी संशयिताविरुद्ध भादंसंच्या कलम ५०४, ३३२, ३५३ तसेच बाल न्याय व गोवा भिक्षा प्रतिबंद कायद्याअन्वये गुन्हा नोंदविला. पोलिसांनी या रेस्क्यू केलेल्या आठ व पाच वर्षीय मुलाची रवारनगी सुरक्षा घरात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT