Sonali Phogat Murder Dainik Gomantak
गोवा

Sonali Phogat Case : जामीन मंजूर मात्र एडविनला रेस्टॉरंटमध्ये जाण्यास मज्जाव

सोनाली फोगट मृत्यू प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाचा आदेश

गोमन्तक डिजिटल टीम

Sonali Phogat Case : सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाशी संलग्न असलेल्या कर्लिस रेस्टॉरंटचा चालक एडविन नुनिस यास म्हापसा अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी (7 सप्टेंबर) सशर्त जामीन मंजूर केला. मात्र संशयितास कर्लिस रेस्टॉरंटमध्ये जाता येणार नाही, ही महत्त्वाची अट घातली आहे. 30 हजारांचे वैयक्तिक बाँड व प्रत्येकी 15 हजारांचे दोन स्थानिक हमीदारासह हा सशर्त जामीन न्यायालयाने संशयित एडविन नुनिस यास दिला. त्याचप्रमाणे विनापरवानगी गोव्याबाहेर जाता येणार नाही व तपास कामात कुठलाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असेही जामीनात म्हटले आहे.

तपास अधिकाऱ्यांना चौकशीवेळी सहाय्य करण्यासोबत पोलिसांच्या मागणीनुसार पोलिस स्थानकात हजेरी लावण्याचे निर्देश न्यायालयाने या सशर्त जामिनावेळी दिले. बुधवारी सायंकाळी म्हापसा अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाने हा निवाडा दिला.

दरम्यान, मंगळवारी संशयित एडविन नुनिस यांच्या जामीनावर युक्तिवाद झाले होते. त्यानुसार, हा निवाडा न्यायालयाने राखून ठेवलेला. वरिष्ठ वकिल सुरेंद्र देसाई यांनी एडविन नुनिस यांच्यावतीने न्यायालयात युक्तिवाद केले होते.

पोलिस कोठडीचा अर्ज फेटाळला

तसेच भाजपा नेत्या सोनाली फोगट हत्येशी निगडित एनडीपीएस प्रकरणात, संशयित दत्तप्रसाद गावकर, रामदास मांद्रेकर व एडविन नुनिस या तिघांना पोलीस कोठडी देण्यात यावी, अशा मागणीचा नवीन अर्ज हणजूण पोलिसांनी म्हापसा न्यायालयात केला होता. हा अर्जदेखील न्यायालयाने फेटाळला. सध्या तिघेही संशयित हे न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यातील संशयित एडविन नुनिस यास बुधवारी जामीन मंजूर झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT