Mapusa Court Summons Arvind Kejriwal Dainik Gomantak
गोवा

Mapusa Court Summons Arvind Kejriwal: म्हापसा न्यायालयाचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स

राजकीय द्वेषातून ही कारवाई होत असल्याने अरविंद केजरीवाल हजर राहणार नसल्याचे पक्षाचे गोवा प्रमुख ॲड. अमित पालेकर यांनी म्हटले आहे.

Pramod Yadav

Mapusa Court Summons Arvind Kejriwal: म्हापसा न्यायालयाच्या वतीने आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल समन्स बजावले आहे. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या काळात आम आदमी पक्षाच्या प्रचारावेळी स्टीकर्स लावून मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहे.

राजकीय सूडापोटी ही कारवाई होत असल्याने अरविंद केजरीवाल हजर राहणार नसल्याचे पक्षाचे गोवा प्रमुख ॲड. अमित पालेकर यांनी म्हटले आहे. तसेच, याप्रकरणी कायदेशीर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असे पालेकरांनी म्हटले आहे.

दरम्यान, पेडणे पोलिसांनी याप्रकरणी एप्रिल महिन्यात देखील अरविंद केजरीवाल यांच्यासह ॲड. अमित पालेकर यांना समन्स बजावले होते.

विधानसभा निवडणुकीवेळी ‘आप’ने सरकारी तसेच काही खासगी मालमत्तांवर पक्षाचा प्रचार करण्यासाठी काढता न येणारे स्टीकर्स लावले होते.

या मालमत्ता विद्रुपीकरणाची केंद्रीय निवडणूक आयोगाने दखल घेतली होती. या प्रकरणानंतर सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) एक पथक गोव्यात आले होते. ‘ईडी’ने याबाबत पेडणे पोलिस स्थानकातही तक्रार दिली होती. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT