Mapusa Child Safety Dainik Gomantak
गोवा

चिमुकलीवरील अत्याचारामुळे संतापाची लाट; टुगेदर फॉर म्हापसा संघटनेचे पालिकेला निवेदन, सुरक्षा उपायांच्या त्वरित अंमलबजावणी मागणी

Mapusa Child Safety: एका गरीब फेरीवाल्याच्या चार वर्षांच्या निष्पाप बालिकेवर झालेल्या कथित बलात्कार प्रकरणाने संपूर्ण म्हापसा शहर हादरले असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: एका गरीब फेरीवाल्याच्या चार वर्षांच्या निष्पाप बालिकेवर झालेल्या कथित बलात्कार प्रकरणाने संपूर्ण म्हापसा शहर हादरले असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या भयानक घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला असून ‘टुगेदर फॉर म्हापसा’ या संस्थेने मंगळवारी, म्हापसा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करून शहरात सर्वसमावेशक सार्वजनिक सुरक्षा उपायांची तातडीने अंमलबजावणी करण्याची आक्रमक मागणी केली आहे.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष महेश राणे, जितेश कामत, योगेश केळकर, राजेश मराठे, विजय भिके, सुदेश हसोटीकर व इतर पदाधिकारी हजर होते.

संस्थेचे अध्यक्ष ॲड. महेश राणे आणि सरचिटणीस जितेश कामत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही घटना एकाकी नसून शहरात गुन्हेगारी आणि असामाजिक कृत्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यापूर्वी सराफाची हत्या, भरदिवसा घडलेल्या घरफोड्या, डॉक्टरच्या घरावर दरोडा, तसेच बँकांच्या बाहेर व सार्वजनिक ठिकाणी उघडपणे चालणारे देहव्यापार यांसारख्या घटनांमुळे महिला, बालके आणि सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

या समस्येवर मात करण्यासाठी शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ, बसस्थानक व संवेदनशील ठिकाणी तात्काळ एआय-सक्षम सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते पोलिस नियंत्रण कक्षाशी जोडावेत आणि यासाठी मंजूर निधीच्या विलंबाचे कारण स्पष्ट करावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच गुन्हेगारांचे अड्डे ठरणाऱ्या शहरातील जुन्या, धोकादायक व बेवारस इमारतींचे ‘सुरक्षा ऑडिट’ करून त्या तात्काळ सील कराव्यात.

याव्यतिरिक्त, फेरीवाला कायद्यानुसार ‘टाउन वेंडिंग कमिटी’चे कामकाज, फेरीवाला क्षेत्रांची आखणी आणि तीन वर्षांतील बैठकांचे इतिवृत्त जाहीर करून पदपथ सुरळीत करावेत, असेही नमूद केले आहे.

‘शहर सुरक्षा योजना जाहीर करा’

म्हापसा पालिका, पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने संयुक्त बैठक घेऊन स्ट्रीट लाइट्स, पोलिस गस्त आणि नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी सर्वसमावेशक ‘शहर सुरक्षा योजना’ जाहीर करावी. केवळ पोकळ आश्वासने न देता ठोस कृती आराखडा राबवून उत्तर द्यावे, असा थेट इशारा संघटनेने दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'मला विराट कोहलीसारखं खेळायचंय...' सेहवागच्या मुलाचे वक्तव्य चर्चेत; UAE विरुद्ध 160 धावांची खेळी करत दाखवला दम

नरकासुर पाहण्यास गेलेली बेपत्ता तरुणी सापडली; अपहरण नव्हे, मित्रासोबत गेल्याचे तरुणीकडून स्पष्ट

Goa Congress RGP Alliance: जागावाटपाबाबत काँग्रेसकडून उशीर, 'आरजी'च्या बारा मतदारसंघांतील प्रमुखांसोबत बुधवारी बैठक

खरी कुजबुज; शिवसेनेची पत्रकबाजी!

Private Bus Hits Scooter: डिचोलीत खासगी प्रवासी बसची स्कूटरला धडक, एक महिला गंभीर; दुसरी थोडक्यात बचावली

SCROLL FOR NEXT