Fraud, Scam Canva
गोवा

Goa Crime: नोकरीचे आमिष दाखवून महिलेला तीन लाखांचा गंडा

Mapusa Police: म्हापसा पोलिसांनी एकास अटक केली

गोमन्तक डिजिटल टीम

कोलवाळ येथील एका महिलेला सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तिच्याकडून तीन लाख रूपये उकळल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी चिन्मय अनिल मुजूमदार (४१, रा. फोंडा व मूळ वास्को) यास अटक केली.

हा प्रकार गेल्या वर्षी घडला होता. याप्रकरणी फिर्यादी महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. फिर्यादींच्या दीराचे दुकान असून तिथे संशयित ये-जा करत असे. त्यामुळे त्यांच्यात ओळख झाली होती.

आपण मुख्यमंत्र्यांचा कार्यकर्ता असून लोकांना सरकारी नोकऱ्या मिळवून देतो, तुझ्याकडे कुणी असल्यास सांग असे संशयिताने फिर्यादींच्या दीराला सांगितले. त्यांनी आपली भावजय असल्याचे संशयिताला सांगितले. नंतर सरकारी नोकरी देतो, असे सांगून संशयिताने फिर्यादींकडून तीन लाख रूपये घेतले. नोकरी मिळाली नाही तसेच पैसेही परत करत नसल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. नंतर पोलिसांनी कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

Goa Pocso Case: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

"7000 हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह!", कर्नाटकातील सर्व शिक्षण संस्थांमध्ये अलर्ट; दोन वर्षात बाधितांचा आकडा 66 हजारांच्या पार

SCROLL FOR NEXT