Sadanand Tanavade Dainik Gomantak
गोवा

पक्ष मजबूतीसाठी गोव्यातील व्यावसायिक भाजपमध्ये प्रवेश करणार: सदानंद तानावडे

दक्षिण गोव्यातील सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद देसाई यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: पक्षाला आणखी मजबूत करण्यासाठी गोव्यातील अनेक डॉक्टर, अभियंते आणि सेवानिवृत्त व्यावसायिक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी गुरुवारी केले. (Many renowned professionals from goa to join BJP soon says Sadanand Tanavade)

दक्षिण गोव्यातील (South Goa) सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद देसाई यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी भाजपचे आमदार गणेश गावकर आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे उपस्थित होते.

दरम्यान, तानावडे म्हणाले की, विविध मान्यवर भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. डॉ देसाई यांचा लवकरच भाजपच्या डॉक्टर्स सेलमध्ये समावेश करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. "आता भाजपमध्ये सामील होणारे लोक विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची उमेदवारी मिळवण्याच्या उद्देशाने सामील होत नाहीत, कारण पुढील विधानसभा निवडणुका चार वर्षे आणि दोन महिन्यांवर आहेत," असे तानावडे म्हणाले.

रुग्णालयाचा मालक या नात्याने मला लोकांची तसेच राजकारण्यांची मदत हवी आहे. मी वैद्यकीय शिबिरे आयोजित करून समाजासाठी योगदान देईन," असे डॉ. मिलिंद देसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

Budh Gochar 2026: हस्त नक्षत्रात बुधाचे महागोचर! 5 राशींच्या जातकांची तिजोरी पैशांनी ओसंडून वाहणार; व्यवसायात येणार मोठी तेजी

Education System Crisis: सत्य निकेतनची इमारतच नाही, तर शिक्षण व्यवस्थाही ढासळतेय! विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेपासून शिक्षणाच्या बजेटपर्यंत गंभीर प्रश्न

Karapur Mega Project: 161 दिवसांनंतर कारापूरवासीयांचे आंदोलन अखेर मागे! 'वन गोवा' प्रकल्पाला काम बंद करण्याची पंचायतीची नोटीस; न्यायालयीन लढा मात्र सुरूच

SCROLL FOR NEXT