PM Narendra Modi Goa Visit Photo Dainik Gomantak
गोवा

PM Narendra Modi: आपत्कालीन स्थितीत अनेकांचा बचाव शक्य

PM Narendra Modi: मोदी: बेतूल येथे सागरी बचाव प्रशिक्षण केंद्र

दैनिक गोमन्तक

PM Narendra Modi: गोव्यातील ‘ओएनजीसी’ चे सागरी बचाव केन्द्र राष्ट्राला समर्पित करताना आनंद होत आहे. हे अत्याधुनिक केंद्र सागरी बचाव प्रशिक्षण परिसंस्थेत आपला ठसा उमटवण्याच्या दृष्टीने भारतासाठी एक महत्वाचा क्षण आहे.

कठोर आणि तीव्र आपत्कालीन प्रतिसाद प्रशिक्षण प्रदान केल्याने अनेकांचे जीव वेळीच वाचवता येतील याची खातरजमा करता येईल, असे उद्‍गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेतुल येथे काढले.

पंतप्रधानांच्या हस्ते फलकाचे अनावरण करून तेल व नैसर्गिक वायू आयोगाच्या एकात्मिक सागरी बचाव प्रशिक्षण केंद्राचे उद्‍घाटन झाले. पाण्याखालील बचावकार्यांची माहिती आणि प्रशिक्षण केंद्राची प्रात्यक्षिके देखील पंतप्रधानांनी यावेळी पाहिली.

यावेळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय नैसर्गिक वायूमंत्री हरदीपसिंग पुरी उपस्थित होते.

पंतप्रधानांनी ट्विटरवर पंतप्रधानांनी आधुनिक सागरी बचाव केंद्राची गरज अधोरेखित करणारी एक चित्रफीत देखील सामायिक केली आहे. त्यांनी नमूद केले आहे, की म्हणूनच आम्हाला आधुनिक सागरी बचाव केंद्राची गरज होती आणि ते आपल्या देशासाठी खूप फायदेशीर ठरेल.

10 ते 15 हजार जणांना प्रशिक्षण

बेतूल येथील सागरी बचाव केंद्र हे भारतीय सागरी बचाव प्रशिक्षण परिसंस्थेला जागतिक मानकांपर्यंत नेण्यासाठी एक विलक्षण असे एकात्मिक सागरी बचाव प्रशिक्षण केंद्र म्हणून विकसित केले आहे. येथे दरवर्षी 10 त 15 हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. टोकाच्या हवामान स्थितीतील प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींची सागरी कौशल्ये वाढवेल आणि अशा प्रकारे वास्तविक जीवनातील आपत्तींपासून सुरक्षित बचावाची शक्यता वाढेल, अशी माहिती उद्‍घाटनावेळी देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ओव्हरस्पीडिंगचा थरार! वळणावर नियंत्रण सुटलं अन् तोंड फुटलं, बाईकस्वाराचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल; तुम्ही बघितलात का?

"करारासाठी इराण रडकुंडीला आला होता, मी नाही!", मोजतबा खामेनेईंच्या दाव्यावर भडकले ट्रम्प; विरोधी पक्षालाही घेतले फैलावर VIDEO

Goa Water Supply: दुसऱ्या दिवशीही पाणीटंचाईचा फटका, डिचोलीतील 'ती' मुख्य जलवाहिनी पुन्हा फुटली! शुक्रवारी दुपारनंतर दुरुस्ती पूर्ण

Goa Rainfall: पावसाची 71 टक्के विक्रमी तूट, शेवटच्या आठवड्यात तुटवडा दूर होण्याची शक्यता

तीन तरुणी अन् एक तरुण... आश्वे-मांद्रे रस्त्यावर एकाच दुचाकीवरून चौघांचा जीवघेणा प्रवास, वाहतूक नियमांना हरताळ

SCROLL FOR NEXT