manoj bajpayee social news xyz
गोवा

Manoj Bajpayee At IFFI: 'वेळेत पूर्णविराम आणि संवादात मौन हवे'; मनोज वाजपेयीने सांगितले अभिनेत्यांबाबतीत दोन टप्पे

Manoj Bajpayee In Conversation Session: दिलेल्या वेळेत पूर्णविराम आणि संवादात मौन हवे. जेव्हा संवाद नसतो, तेव्हा खूप संवाद असतात आणि तेव्हा अभिनेत्याचे काम महत्त्‍वाचे असते, असे प्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Manoj Bajpayee At IFFI In Conversation Session

पणजी: लहान वयातच मला संवादाचा अर्थ समजला. तेव्हापासून संवाद सादरीकरणावर मी काम करायला सुरवात केली. संवादात पूर्णविराम सर्वांत महत्त्वाचा आहे. दिलेल्या वेळेत पूर्णविराम आणि संवादात मौन हवे. जेव्हा संवाद नसतो, तेव्हा खूप संवाद असतात आणि तेव्हा अभिनेत्याचे काम महत्त्‍वाचे असते, असे प्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी यांनी सांगितले.

आपल्‍या मुलाखतीत वाजपेयी यांनी आपली अभिनय कारकीर्द आणि त्याच्या कौशल्याच्या उत्क्रांतीबद्दल सांगितले. अभिनेत्याच्या कारकिर्दीच्या दोन वेगळ्या टप्प्यांवर त्‍यांनी विचार मांडले.

ते म्‍हणाले, जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा एक जरी संवाद कापला गेला तर तुम्ही दिग्दर्शकाशी भांडता. पण जसजसे तुम्ही मोठे होता, तसतसे तुम्हाला अनेक संवाद अनावश्यक वाटतात.

एका अभिनेत्याचे दोन टप्पे असतात. एक ४०च्या आधीचा आणि दुसरा ४०च्‍या नंतरचा. ४० नंतर आम्ही कलाकार म्हणून काय करतो आणि काय होऊ शकते हे समजते.

वाजपेयी यांनी आपण साकारलेल्या पात्रांच्या दीर्घकालीन प्रभावाची कबुली दिली. ते म्हणाले की, मी आत्तापर्यंत साकारलेल्या पात्रांमधून बाहेर पडलो आहे असे मी आजही म्हणू शकत नाही. मी फक्त इतर गोष्टी स्वीकारल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT