Manohar Parrikar construction

 

Dainik gomantak

गोवा

मनोहर पर्रीकर बगलमार्गाची वाताहत, बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा संशय

कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा संशय असून, या कामाची चौकशी व्हावी, अशी येथील लोकांची मागणी आहे.

दैनिक गोमन्तक

चाररस्ता ते माशे पर्यंतच्या बगल मार्गाला स्व. मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे नाव देण्यात आले असून, सद्यःस्थितीत या बगल मार्गाची वाताहत बनली आहे. कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा संशय असून, या कामाची चौकशी व्हावी, अशी येथील लोकांची मागणी आहे.

मनोहर पर्रीकर बगल चारपदरी रस्त्यावरील पुलाला तडे गेलेल्या जोडणीचे दुरूस्ती सुरू झाली असली तरी यापूर्वी सहा महिन्यामागे या जोडणीची दुरूस्तीचे काम कंत्राटदार एम. व्ही. आर. कंपनीने केले होती. परंतु केवळ सहा महिन्यांत जोडणी उखडल्याने कामावर संशय घेतला जात आहे.

या बगल रस्त्याचे बांधकाम (construction) निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची तक्रार लोकांकडून वारंवार करण्यात येत होती. तरीही संबंधित कंत्राटदाराकडून दुर्लक्ष केले जात होते, असे लोकांचे म्हणणे आहे.

रस्त्यावर काळोख... स्व. मनोहर पर्रीकर बगल रस्त्यांवरील पथदीपांची दुरवस्था झाली आहे. पथदीप खांबावरून लोंबकळू लागले आहेत. त्यामुळे बगल रस्त्यावर काही ठिकाणी काळोखाचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावर मोकाट गुरांमुळे वारंवार अपघात होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

डिचोली, कारापूर, मये, साळमध्ये 'कोकम' व्यवसायाची लगबग; यंदाही आमसुले होणार 'आंबट', 40% पीक वाया; पावसावर दरवाढ अवलंबून

"तो लहान मुलगा नाही, तो एक वादळ आहे!" WWEच्या रिंगणात वैभव सूर्यवंशीची दहशत! दिग्गज फायटरने टेकले गुडघे Watch Video

Illegal Cattle Slaughter Goa: सुरावलीत गुपचूप चालली होती जनावरांची बेकायदेशीर कत्तल, कर्नाटकच्या दोघांना रंगेहाथ पकडलं; गोवा पोलिसांची धडक कारवाई

SCROLL FOR NEXT