Taxi | Manohar International Airport   Dainik Gomantak
गोवा

Manohar International Airport: टॅक्सी व्यावसायिकांचे आंदोलन मागे; टॅक्सी स्टॅण्डसाठी मान्यता

Goa: मुख्यमंत्र्यांनी दिली लेखी ग्वाही : ‘मोपा’वर यलो-ब्लॅक ऐवजी ब्ल्यू टॅक्सी स्टॅण्डसाठी मान्यता

दैनिक गोमन्तक

Mopa International Airport: पेडण्यातील टॅक्सी व्यावसायिकांनी मोपा विमानतळावर यलो-ब्लॅक टॅक्सी स्टॅण्डसाठी छेडलेल्या आंदोलनावर अखेर तोडगा निघाला. यलो-ब्लॅक ऐवजी ब्लू टॅक्सी स्टॅण्ड सुरू करण्याची लेखी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

हे पत्र टॅक्सी व्यावसायिकांना स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या हस्ते देण्यात आल्यानंतर आर्लेकर यांचे टॅक्सी व्यावसायिकांनी अभिनंदन करत जल्लोष केला. तसेच न्याय मिळाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करत आंदोलन मागे घेतले.

टॅक्सी व्यावसायिकांचे नेते सुदीप ताम्हणकर यावेळी म्हणाले की, आमदार प्रवीण आर्लेकर यांनी काल आम्हाला आश्वासन दिले होते. त्यानुसार आज त्याची पूर्तता त्यांनी स्वतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन केली. त्याबद्दल मी समाधानी आहे.

मात्र, सरकारने टॅक्सी व्यावसायिकांबाबत घेतलेली भूमिका चुकीची होती. त्यामुळेच टॅक्सी व्यावसायिकांना रस्त्यावर यावे लागले. आता टॅक्सी व्यावसायिकांचा प्रश्न सुटलेला आहे. इतर जे काही प्रश्न असतील, तेही टप्प्या-टप्प्याने सोडवले जातील.

‘आप’च्या नेत्या प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या की, आम्ही राजकारण

बाजूला ठेवून या टॅक्सी व्यावसायिकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आम्ही जरी विरोधी पक्षाचे नेते असलो तरी एखाद्या आमदाराने चांगले काम केले तर त्यांचे कौतुक करणे आमचे कर्तव्य आहे. टॅक्सी व्यावसायिकांचा प्रश्‍न सोडवल्याबद्दल आमदार प्रवीण आर्लेकर यांचे अभिनंदन! याही पुढे त्यांनी पेडणेवासीयांसोबत राहावे.

जीएमआर कंपनीने विमानतळावर ब्ल्यू टॅक्सी स्टॅण्ड उपलब्ध करावा, अशी सूचना सरकारला केली होती. ही सूचना सरकारने मान्य करून यलो-ब्लॅक टॅक्सी ऐवजी ब्ल्यू टॅक्सी स्टॅण्डला मान्यता दिली. या ब्ल्यू टॅक्सी स्टॅण्डला व्यावसायिकांनीही संमती दर्शवली.

परंतु जोपर्यंत मुख्यमंत्री लेखी आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत आम्ही आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या निवासस्थानासमोरून हलणार नाही, अशी भूमिका आज सकाळी टॅक्सी व्यावसायिकांनी घेतली. अखेर आर्लेकर यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून सायंकाळी चारपर्यंत लेखी आश्वासन देतो, असे सांगितले होते.

मी सदैव पेडणेवासीयांच्या भल्याचा विचार करतो. त्यांच्यासोबत होतो आणि आहे. मोपा विमानतळावरील टॅक्सी व्यावसायिकांचा प्रश्न मी सुरुवातीपासून सरकार दरबारी मांडला आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मला आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता झाली आहे. आज लेखी स्वरूपात टॅक्सी व्यावसायिकांना ग्वाही दिली असल्याने हा प्रश्न सुटला आहे. मोपावर ब्ल्यू टॅक्सी स्टॅण्ड सुरू करण्यात येेणार आहे. - प्रवीण आर्लेकर, आमदार, पेडणे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: मोखर्ड येथे एकाच घरात दोन बहिणींचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; दुर्गंधी आल्यानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार

RBI New FD Rules: 1 ऑक्टोबरपासून बदलणार एफडीचे नियम! सर्व बँकांसाठी आरबीआयचा 'मास्टरस्ट्रोक'; तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम?

Pond Fish Death Goa: गणपती विसर्जनानंतर कपिलेश्वरी-कवळेच्या तळीत मासे मृत; 'बॉम्बसदृश' फटाक्यांमुळे प्रदूषण झाल्याचा स्थानिकांचा दावा

Gomantak TV Engineers Excellence Awards: जिथे प्रश्न, तिथे अभियंत्यांचा 'तोडगा'! गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्डने 11 अभियंत्यांचा गौरव; खांडेपारकरांना जीवनगौरव

Horoscope 21 Saptember 2026: सोमवारचा चमत्कारिक योग! महादेवाची कृपा अन् ग्रहांची साथ; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

SCROLL FOR NEXT